शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

बारामती नगर परिषदेचे दोन वर्षांचे लेखापरीक्षण अहवाल दडवले , अर्थमंत्र्यांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 00:54 IST

बारामती नगर परिषदेचे गेल्या दोन वर्षांचे लेखापरीक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतरसुद्धा ते दडवून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला

बारामती : बारामती नगर परिषदेचे गेल्या दोन वर्षांचे लेखापरीक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतरसुद्धा ते दडवून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला असून, असा गंभीर प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते सुनील सस्ते यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.मागील दोन आर्थिक वर्षातील अहवाल सभागृहापुढे मांडले नसताना आता २०१७— १८चे लेखापरीक्षण करण्यासाठी संबंधित विभागाचे पथक बारामती नगर परिषदेत दाखल झाले आहे. मात्र गेल्या दोन वर्षांचा अहवाल सभागृहापुढे मांडलाच नव्हता. पालिकेचे सन २०१५-१६ व २०१६-१७ चे लेखापरीक्षण् एकत्रीतपणे मार्च २०१८मध्ये झाले. ते झाल्यानंतरही सभागृहापुढे सादर करणे बंधनकारक असताना, तो का दाखल केला नाही, याचे उत्तर प्रशासनाने दिले नाही.नियमानुसार पुढील ४० दिवसांत तो सभागृहापुढे ठेवणे अपेक्षित असते. सभागृहात चर्चा होऊन त्यातील त्रुटी किंवा आर्थिक वसुलीबाबत चर्चा होणे अपेक्षित असते. या परीस्थितीत मागील दोन आर्थिक वर्षाचा अहवाल सादर न होता सन २०१७—१८ चे लेखापरीक्षण करण्यासाठी संबंधित विभागाचे पथक पालिके त दाखल झाले आहे. मागील दोन्ही अहवाल पालिकेला देण्यात आले आहेत. ते सभागृहापुढे ठेवण्याची जबाबदारी नगराध्यक्ष, मुख्याधिकाºयांची असल्याची माहितीदेखील लेखापरीक्षण विभागाच्या संचालकांनी दिल्याचे सस्ते यांनी सांगितले. त्यामुळे जाणीवपूर्वक हे अहवाल दडवल्याचा आरोप सस्ते यांनी केला आहे. मागील २ वर्षांचा लेखापरीक्षण अहवाल सर्वसाधारण सभेच्या मान्य ठरावाच्या प्रतीसह स्थानिक निधी लेखापरीक्षणाचे सहायक संचालकांना प्राप्त झालेला नाही. तरी देखील त्याच्या पुढील तिसºया वर्षाचे २०१७—१८ या कालावधीचे लेखापरीक्षण करण्यास शासनाचा लेखापरीक्षण विभाग येऊच कसा शकतो, असा सवालदेखील सस्ते यांनी केला आहे....हे न उलगडणारेकोडेचलेखापरीक्षणाबाबत माध्यमांनी आवाज उठविल्यानंतर २३ आॅगस्ट २०१८ आणि १ सप्टेंबर २०१८ रोजी पोस्टामार्फत पाठविलेले लेखापरीक्षण अहवाललगोलग २७ डिसेंबर २०१८रोजीच प्राप्त झाले. याबाबत नगराध्यक्षा प्रेसनोटद्वारेकळवितात, हे न उलगडणारे कोडे असल्याचा टोला विरोधी नगरसेवक सुनील सस्ते यांनी लगावला आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीPuneपुणे