शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बारामती लोकसभेसाठी होणार चुरशीची लढत; चंद्रशेखर बावनकुळे यांचे ‘राष्ट्रवादी’ला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 13:11 IST

बावनकुळे म्हणाले, भाजप हा देशातील एक क्रमांकाचा पक्ष आहे. त्यामुळे बारामतीत आमचा खासदार जिंकावा, अशी आमची भूमिका असून तयारी सुरू आहे.

बारामती: बारामती लोकसभा मतदारसंघात झालेल्या राजकीय लढतींपैकी २०२४ची लढाई सर्वांत प्रभावी असेल, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान दिले. बावनकुळे हे मंगळवारी बारामती दौऱ्यावर होते. काटेवाडी येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीला आव्हान दिले. 

बावनकुळे म्हणाले, भाजप हा देशातील एक क्रमांकाचा पक्ष आहे. त्यामुळे बारामतीत आमचा खासदार जिंकावा, अशी आमची भूमिका असून तयारी सुरू आहे. भाजप - सेना युती बारामतीत जिंकेल,  असा आमचा ‘स्पष्ट अजेंडा’ आहे. राष्ट्रवादीच्या अनेक बाबी जनतेला पटत नाहीत. त्यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून अनेक जण भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. यंदा संपूर्ण देशात ४००पेक्षा अधिक, तर राज्यात बारामतीसह लोकसभेच्या जागांवर भाजप निवडून येईल. बारामती लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या उमेदवारीबाबत केंद्रीय नेतृत्व निर्णय घेणार असल्याचे बावनकुळे म्हणाले.

 ...बारामतीचा गड त्यामानाने मोठा नाही -देशात बडे राजकीय गड उद्ध्वस्त झाले आहेत, त्यात काही मोठे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीच केवळ देश मजबूत करू शकतात, हे जनतेला समजले आहे. देशात अनेक राजकीय गड उद्ध्वस्त होतील. बारामतीतील राष्ट्रवादीचा गड त्या मानाने फारसा मोठा नाही, असा टोला बावनकुळे यांनी लगावला. निर्मला सीतारामन पूर्णवेळ प्रभारी -- सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघाची पूर्णवेळ प्रभारीपदाची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे देण्यात आली आहे.  सीतारामन या २३, २४, २५ सप्टेंबर रोजी येणार आहेत.

 पंतप्रधान मोदींची सभा -- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी सभा बारामतीत होणार आहे. त्यामुळे आत्तापासूनच भाजप कार्यकर्त्यांनी मत परिवर्तनासाठी कामाला लागावे, अशा सूचनाही बावनकुळे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिल्या.  

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाBaramatiबारामती