शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

बारामती: माळेगावात चारचाकीत सुरू होते अवैध गर्भलिंगनिदान; डाॅ. शिंदेसह दलाल अटकेत

By ज्ञानेश्वर भोंडे | Updated: June 8, 2024 19:19 IST

याप्रकरणी बारामती उपजिल्हा रुग्णालयाचे वैदयकीय अधीक्षक डाॅ. महेश जगताप यांनी फिर्याद दाखल केली आहे. विशेष म्हणजे डाॅ. शिंदेला अशा प्रकारच्या गुन्हयात अनेकवेळा अटक झाली आहे.....

बारामती/पुणे : पुण्याच्या ग्रामीण भागात मुलींची गर्भातच कळी खुडण्याचा प्रकार सर्रासपणे सूरू आहे. बारामतीमधील माळेगावच्या गाेफणेवस्ती येथे बांधकामाच्या ठिकाणी पाेर्टेबल साेनाेग्राफी मशीनद्वारे गर्भलिंगनिदान साेनाेग्राफी करणा-या डाॅक्टरसह एजंटाला माळेगाव पाेलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. त्यांच्याकडून पाेर्टेबल साेनाेग्राफी मशीनही जप्त केले आहे. याप्रकरणी बारामती उपजिल्हा रुग्णालयाचे वैदयकीय अधीक्षक डाॅ. महेश जगताप यांनी फिर्याद दाखल केली आहे. विशेष म्हणजे डाॅ. शिंदेला अशा प्रकारच्या गुन्हयात अनेकवेळा अटक झाली आहे.

गर्भलिंग निदान करणारा डाॅ. मधुकर चंद्रकांत शिंदे (वय ५२, रा. लक्ष्मीनगर, फलटण, जि. सातारा) आणि एजंट नितीन बाळासाहेब घुले (वय ३७, रा. ढेकळवाडी, ता. बारामती, जि. पुणे) असे या दाेघांना पाेलिसांनी पाठलाग करून पकडले आहे.

पुण्याच्या ग्रामीण भागात चारचाकी गाडीमध्ये गर्भलिंगनिदान हाेत असल्याची तक्रार पुण्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. नागनाथ यमपल्ले यांच्याकडे प्राप्त झाली हाेती. त्या तक्रारीच्या अनुशंगाने डाॅ. यमपल्ले यांनी शिक्रापुर, यवत, दाैंड, इंदापुर व बारामती येथील वैदयकीय अधीक्षकांना पत्र लिहून याेग्य ती कारवाई करण्याच्या सूचना केल्या हाेत्या. त्याअनुषंगाने बारामती उपजिल्हा रुग्णालयाचे वैदयकीय अधीक्षक डाॅ. जगताप यांनी पाेलिसांना डाॅ. शिंदे बाबत माहीती दिली हाेती.

काॅल रेकाॅर्डवरून लागला छडा

याप्रकरणी पाेलिसांनी डाॅ. शिंदे याच्या माेबाईलचे काॅल रेकाॅर्ड तपासले असता ताे एजंट बाळासाहेब घुले याच्या संपर्कात असल्याचे आढळून आले. त्यानुसार बारामती पाेलीस ठाण्याचे पाेलीस उपनिरीक्षक युवराज घाेडके यांनी डाॅ. शिंदे आणि एजंट घुले या दाेघांना शुक्रवार दि. ७ जून राेजी गाेफणेवस्ती येथे साेनाेग्राफी मशीनसह पकडले. त्यांच्यावर गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व राेग निदानतंत्रे (लिंगनिवडीस प्रतिबंध) अधिनियम नुसार माळेगाव पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास माळेगाव पाेलीस ठाण्याचे निरीक्षक बालाजी भांगे करत आहेत.

डाॅ. शिंदे सराईत-

यामध्ये अटक करण्यात आलेला डाॅ. मधुकर शिंदे हा या प्रकारचे गुन्हे करण्यात सराईत आहे. त्याच्यावर याआधी दाैंडमध्ये तसेच सातारा येथेही गुन्हे दाखल आहेत. ताे एजंट घुलेच्या मार्फत गर्भलिंग निदान करणा-या महिलांची पाेर्टाेबल साेनाेग्राफी मशीनद्वारे साेनाेग्राफी करून त्यांच्याकडून लाखाे रूपये उकळत असल्याचे उघडकीस आले आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPregnancyप्रेग्नंसी