शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

३५ वर्षांनंतर सुरू झाले बारामती कापसाचे लिलाव; प्रतिक्विंंटलला मिळाला उच्चांकी दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 18:27 IST

पहिल्याच दिवशी ३० क्विंटल आवक...

बारामती (पुणे) :बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलावास सुरूवात झाली. बुधवारी (दि. २) उघड लिलाव पद्धतीने कापूस खरेदी-विक्रीचा शुभारंभ झाला. यावेळी शिरवली येथील शेतकऱ्याला प्रतिक्विंटल ८ हजार ९०१ रूपये असा उच्चांकी दर मिळाला. ३५ वर्षांनंतर कापूस लिलाव सुरू झाल्याची आठवण येथील ज्येष्ठ उद्योजक जवाहर वाघोलीकर यांनी यावेळी सांगितली.

बारामती मर्चन्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष जवाहर वाघोलीकर व बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, प्रशासक मिलिंद टांकसाळे यांच्या हस्ते कापूस लिलावाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जवाहरशेठ वाघोलीकर म्हणाले, बारामती बाजार समितीची ओळख पूर्वी कॉटन मार्केट म्हणून ओळख होती. १९७७ पूर्वी बारामती बाजार समितीच्या आवारात एक ते दीड लाख क्विंटल कापसाची आवक होत होती. ३५ वषार्नंतर परत कापसाचे लिलाव होत असल्याने आनंद होत आहे. त्यामुळे भविष्यात बारामती बाजार आवारात कापसाची मोठी आवक होईल व कॉटन मार्केट म्हणून बारामती बाजारपेठ पुन्हा आपली ओळख निर्माण करेल.

तालुक्यातील इतर संस्थांनी कापसासाठी जिनिंग उभारून सहभाग घ्यावा. त्यामुळे कापसाला चांगले दिवस येतील. बाजार समितीने आवक व कापूस लागवड वाढी बाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे. कापूस पिकावर परिसंवाद घेऊन शेतकऱ्यांना उत्पादन वाढीबाबत माहिती द्यावी. तसेच व्यापाऱ्यांना सुविधा देऊन कापसासाठी शेड उभारावे असे मत वाघोलीकर यांनी व्यक्त केले.

पहिल्याच दिवशी ३० क्विंटल कापसाची आवक...पहिल्या दिवशी कापसाची ३० क्विंटलची आवक झाली. यावेळी कापसाला प्रतिक्विंटल ८ हजार ९०१ रूपये एवढा उच्चांकी दर मिळाला. तर सरासरी ७ हजार ५०० रूपये प्रति क्विंटल दर निघाला. येथील व्यापारी कल्पेश सोनवणे यांच्या आडतीवर शिरवली येथील शेतकरी राजेंद्र जानू मदने यांच्या कापसास ८ हजार ९०१ उच्चांकी दर मिळाला. यावेळी बाळासाहेब फराटे, शिवाजी फाळके, उमेश सोनवणे, केशवराव मचाले यांच्या आडतीवर कापसाची आवक झाली.

खरेदीदार म्हणून अमोल वाडीकर, संभाजी किर्वे, निलेश भिंगे, बाळासो फराटे यांनी सहभाग घेतला. कापूस लिलावावेळी शेतकरी, खरेदीदार, आडते स्वागत प्रशासक मिलिंद टांकसाळे यांनी केले. यावेळी बारामती बाजार समितीचे माजी सदस्य रमेशराव गोफणे, अनिल खलाटे, सुनिल पवार, दत्तात्रय सणस, राजेंद्र बोरकर, ज्ञानदेव कदम, सुर्यकांत गादिया, शरद भिंगे व बाजार समितीचे माजी सचिव शिर्के साहेब, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अमोल वाडीकर, मिलिंद सालपे तसेच इतर व्यक्ती व समितीचे सेवक उपस्थित होते. कार्यक्रमानंतर आभार बारामती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी मानले.

कापसाचे लिलाव दर बुधवार व शनिवार या दिवशी सकाळी ११.०० वाजता सुरू  होणार आहेत.  शेतकऱ्यांनी आपला कापूस स्वच्छ व निवडून आणावा. त्यामुळे आणखी चांगला दर मिळेल. कापूस हे नगदी पिक  हमखास उत्पन्न देणारे आहे. आज बारामती व फलटण या तालुक्यातून कापसाची आवक झाली.- अरविंद जगतापसचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीcottonकापूस