बारामती : आपल्या पालकांपासून दुरावलेल्या चार बालकांना त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवून ‘आॅपरेशन मुस्कान’ यशस्वी केल्याबद्दल बारामती पोलिसांचा जैन सोशल ग्रुप, रोटरी क्लबच्या वतीने सत्कार करण्यात आला. केंद्रीय महिला व बाल कल्याण मंडळाच्या माध्यमातून भारतभर १ जुलैपासून पोलिसांच्या साह्याने हरवलेल्या व विस्थापित झालेल्या मुलांसाठी ‘आॅपरेशन मुस्कान’ राबविण्यात येत आहे. बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे आॅपरेशन यशस्वीपणे करण्यात आले. त्यांच्या या कार्यक्षमतेला प्रोत्साहन देण्यासाठी जैन सोशल ग्रुप व रोटरी क्लब आॅफ बारामतीच्या पदाधिकारी, सभासदांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या वेळी जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष प्रफुल्ल गदिया, सचिव चेतन व्होरा, पंकज गदिया, संतोष मेहता, विनोद ओसवाल, साहिल शहा, रोटरी क्लब आॅफ बारामतीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, माजी अध्यक्ष स्वप्निल मुथा, सम्राट सोमाणी, सन्मित शहा आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
बारामती शहर पोलिसांचा सत्कार
By admin | Updated: July 11, 2015 04:03 IST