शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

Baramati bypoll Election: काँग्रेस माघार घेणार ? आकाश मोरेंनी स्पष्टच सांगितलं,पक्षाकडून जो आदेश येईल..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 13:25 IST

Baramati bypoll Election : लोकांकडून मला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. जनतेच्या भावना जपणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे आणि त्याबाबत मी वरिष्ठांना अवगत केले आहे.

बारामती : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या निवडणूक प्रक्रियेत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण करण्यात आली असून त्यापैकी ५३ अर्ज वैध ठरले आहेत. यापैकी ६ उमेदवारांनी बुधवारी (दि. ८) आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे आता एकूण ४७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांनी दिली. आज बारामतीत काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना पक्षाच्या निर्णयाचे पालन करण्याची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले,पक्षाकडून जो आदेश येईल, तो मला मान्य असेल. अद्यापपर्यंत मला कोणताही अधिकृत आदेश मिळालेला नाही. हर्षवर्धन सपकाळ यांच्या माध्यमातून जो काही निर्णय कळवण्यात येईल, तो मी स्वीकारेन.माध्यमांशी बोलतांना मोरे पुढे म्हणाले, मी हर्षवर्धन सपकाळ यांच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ते पक्षाचे प्रमुख असून वडेट्टीवार यांचेही नेतृत्व करतात. त्यामुळे ते जो निर्णय देतील, तो मला मान्य असेल. आतापर्यंत पक्षाकडून कोणत्याही प्रकारच्या सूचना मिळालेल्या नाहीत.रोहित पवार आणि इतर वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाल्याचे सांगत त्यांनी सकारात्मक संवाद झाल्याचा विश्वास व्यक्त केला. लोकांकडून मला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. जनतेच्या भावना जपणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे आणि त्याबाबत मी वरिष्ठांना अवगत केले आहे. असेही त्यांनी नमूद केले. मला निवडणूक लढवावी, अशी जनतेची अपेक्षा आहे. बारामतीसारख्या ठिकाणी भूमिका घेण्याची संधी मिळाल्याने मी आनंदी आहे. येथील प्रलंबित प्रश्न मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे, असे ते म्हणाले.पक्षाच्या संभाव्य निर्णयाबाबत बोलताना मोरे म्हणाले, वरिष्ठांचा फोन आल्यानंतरच अंतिम निर्णय घेईन. माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. सपकाळ यांनीही काहीही निर्णय झाला तरी मी तुझ्या पाठीशी मोठ्या भावाप्रमाणे उभा राहीन असे आश्वासन दिले आहे.शरद पवार यांच्या पक्षाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, त्यांचा पक्ष आणि आमचा पक्ष वेगळा आहे. अद्याप कोणतीही सूचना मिळालेली नसल्याने मी सध्या माझ्या उमेदवारीवर ठाम आहे. पक्ष जो निर्णय घेईल, त्या नियमांना मी बांधील राहीन. तसेच, मकरंद पाटील यांच्या जिल्ह्यातील आणि तालुक्यातील राजकीय परिस्थिती पाहता ते उमेदवारी मागे घेण्याचा सल्ला देणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Baramati Bypoll: Congress Candidate Awaits Party's Decision on Withdrawal

Web Summary : Congress candidate Akash More awaits party orders regarding Baramati bypoll withdrawal. He filed nomination through Harshvardhan Sapkal and will accept the party's decision. More had positive talks with Rohit Pawar, emphasizing people's wishes and pending local issues. He remains firm until further instructions.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBaramatiबारामतीPuneपुणेElectionनिवडणूक 2026