शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 14:11 IST

Baramati By Election 2026 : दादांसाठी बारामती आई प्रमाणे होती. बारामतीचा प्रत्येक नागरीक हा दादांसाठी पांडुरंग होता. बारामतीकरांची सेवा म्हणजेच पांडुरंगाची सेवा, हाच दादांचा विश्वास होता. बारामती हा दादांचा श्वास होता. म्हणूनच त्यांचा अखेरचा श्वासही बारामतीच्या मातीतच विसावला." 

बारामतीकरांच्या विकासासाठी आणि अजित दादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझे दुःखही तळघरात कोंडले आणि अत्यंत धिराने आपल्या सर्वांसाठी बाहेर पडले. मात्र मला हा धीर तुम्हा बारामतीकरांकडे बघूनच आला आहे. तुमचे प्रेम, तुमचा पाठिंबा आणि तुमची साथ हीच माझी शक्ती आहे. हे मी नम्रपणे कबूल करते. गेल्या ३५-३६ वर्षांत आपण अजित दादांना प्रचंड मतांनी निवडून दिले आहे. दादांसाठी प्रत्येक बारामतीकर आपणच उमेदवार आहोत, या भावनेने निवडणूक हाती घेत असत. म्हणूनच दादांनी प्रत्येक वेळी स्वतःचेच विक्रम मोडीत काढले आहे. आपल्या मताचा बोजा माझ्यावर आहे, म्हणून मी २४ तास काम करतो, असे दादा नेहमीच म्हणायचे. त्यांच्या माघारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे ही केवळ निवडणूकच नाही, तर दादांना श्रद्धांजली अर्पण करण्याची खरी संधी आहे," असे भावनिक आवाहन आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या सर्वेसर्वा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीकरांना केले. त्या बारामती येथे विधानसभा पोट निवडणुकीचा अर्ज भरण्यापूर्वी आयोजित पक्षाच्या मेळ्याव्यात बोलत होत्या.

...म्हणूनच त्यांचा अखेरचा श्वासही बारामतीच्या मातीतच विसावला -सुनेत्रा पवार म्हणाल्या, "अवघ्या दोनच महिन्यांपूर्वी आपण अजित दादांना गमावले. यानंतर आता बारामती विधानसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीचा उमेदवारी आर्ज आज दाखल करत आहे. बारामतीत अशा पद्धतीने पोटनिवडणूक होईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. दादा आपल्यात नाहीत, असे अजूनही वाटत नाही आणि हे मला मान्यही नाही. पण नियतीने माझ्यावर, आपल्यावर ही वेळ आणली आहे. दादांचे जाणे ही केवळ माझी आणि माझ्या कुटुंबाची वैयक्तिक हाणी नाही तर, बारामती, राज्य आणि देशाची हाणी आहे. दादांसाठी बारामती आई प्रमाणे होती. बारामतीचा प्रत्येक नागरीक हा दादांसाठी पांडुरंग होता. बारामतीकरांची सेवा म्हणजेच पांडुरंगाची सेवा, हाच दादांचा विश्वास होता. बारामती हा दादांचा श्वास होता. म्हणूनच त्यांचा अखेरचा श्वासही बारामतीच्या मातीतच विसावला."  "बारामतीची प्रतिष्ठा जराही कमी होऊ देणार नाही" -"पवार साहेबांनी बारामतीला विकासाचा दृष्टिकोण दिला आणि अजित दातांनी त्यात रंग भरले आणि जागतिक दर्जाकडे नेले. आपल्या बारामतीची प्रतिष्ठा जराही कमी होऊ देणार नाही, असे वचन मी बारामतीकरांना देते. बारामती तालुकाहा जगातील सर्वात विकसित आणि सर्वात प्रगत तालुका बनवणे हे दादांचे स्वप्न नव्हते तर एक ध्यास होता. त्यांना बारामती हे जागतिक दर्जाचं शहर बनवायचं होतं. मात्र त्यांना नियतिने आपल्यातून नेले. दादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही. हे त्रिवार सत्य आहे. मात्र, त्यांचा विकासाचा विचार पुढे नेण्याचा निर्धार मात्र मी केला आहे. ते शब्दाला जागणारे होते. त्यांचा एकही शब्द खाली पडू देणार नाही. त्यांना साक्षिला ठेऊनच मी तुम्हाला हे वचन देते," असेही सुनेत्रा पवार यावेळी म्हणाल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Sunetra Pawar vows to fulfill Ajit Dada's dream for Baramati.

Web Summary : Sunetra Pawar, contesting Baramati's by-election, pledged to fulfill Ajit Dada's vision. She acknowledged her grief but draws strength from Baramati's support. She promised to uphold Baramati's prestige and continue its development, honoring Ajit Dada's dedication.
टॅग्स :Sunetra Pawarसुनेत्रा पवारBaramatiबारामतीNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूक 2026