शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
2
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
3
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
4
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
5
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
6
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
8
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
9
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
10
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
11
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
12
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
13
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
14
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
15
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
16
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
17
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
18
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
19
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
20
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर

बारामतीत भोंदूची ‘दादागिरी’

By admin | Updated: July 29, 2015 00:10 IST

तेरा बच्चा खून की उलटी करेगा । बिमार होके मरेगा । ऊसे २ हजार ५०० रुपये का कफन खरीद, उसकी अर्थी को खंदा देणे मै आऊंगा ।

- प्रशांत ननावरे, बारामतीतेरा बच्चा खून की उलटी करेगा । बिमार होके मरेगा । ऊसे २ हजार ५०० रुपये का कफन खरीद, उसकी अर्थी को खंदा देणे मै आऊंगा ।चिंता मत करना बेटा... हा कोणत्याही चित्रपटातील संवाद नाही. तर एका कथीत भोंदूने बारामतीकर नागरिकांवर दाखविलेली ‘दादागिरी’ आहे. पोस्टाने पाठविलेले दैवी ताकत असलेले कवच पैसे भरून न घेतल्याने हा भोंदू मोबाईलवर फोन करून, एसएमएस पाठवून धमकी देत आहे. त्यामुळे बारामतीकर कमालीचे धास्तावले आहेत. बारामती शहरातील प्रगतीनगर परिसरातील नागरिकांनी धार्मिक श्रद्धेतून कौटुंबिक सुरक्षिततेसाठी जानेवारी महिन्यात कवच घेतले होते. सिमला येथून हे कवच आल्याचे पार्सलवर नमूद आहे. त्यासाठी या नागरिकांनी प्रत्येकी २ हजार ५०० रुपये खर्च केले.तुमच्या मोबाईल क्रमांकाची भाग्यवान ग्राहक म्हणून निवड झाली आहे. दैवी कृपा असलेले कवच तुम्हाला पाठविण्यात येत आहे, असा भावनात्मक संवाद या नागरिकाशी संबंधितांनी साधला. यावेळी फोनवर धार्मिक मंत्रोपच्चार, मंत्र पठण देखील त्या नागरिकाला ऐकू जातील, याची दक्षता घेण्यात आली. त्यामुळे प्रभावित होऊन त्याने कवच घेतले. मात्र, काही दिवसांपूर्वी पुन्हा हे कवच पार्सल पाठविण्यात आले. मागणी केलेली नसताना हे पार्सल पाहून आश्चर्यचकीत झालेल्या नागरिकाने हे कवच परत पाठविले. त्यानंतर भोंदूचे खरे स्वरूप उघड झाले. २ हजार ५०० रुपये भरून कवच स्वीकारण्यासाठी एसएमएस, मोबाईलद्वारे धमकाविण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. आपका बेटा मर गया है ... आप घर चले जावो... गुरूजी की सर्प ने उसे मारा है... कफन लेकर जाना ... बेटा मंदिर का अपमान करोगे तो परेशान रहोगे... कवच वापस होने से दुर्घटना घटेगी । पूत्र धन कार्य की हानी होगी । तेरा वंश आगेभी नही बढेगा । तेरे बच्चो की कुंडली भेजी थी । वह वापस आनेसे अग्निकुंडमे भस्म कर दीया जाएगा । भगवान कोप करेगा । सर्प कुत्ता बच्चे को काटेगा,असे धार्मिक संकटाचे भीती घालणारे एसएमएस या नागरिकाला पाठविण्यात येत आहेत. मोबाईलवरूनही धमकावणीएसएमएसला प्रतिसाद न दिल्याने भोंदूने चक्क मोबाईलवर संपर्क साधून धमकाविण्यास सुरुवात केली आहे. ‘मेरे खिलाफ पोलीस कंम्पलेंट करोगे, फिरभी कुछ नही होगा’ असे सांगण्यास देखील हा भोंदू विसरला नाही.शहरातील प्रगतीनगर परिसरात नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. धार्मिक श्रद्धेतून कौटुंबिक सुरक्षिततेच्या भावनेतून घेतलेले कवच बारामती नागरिकरांसाठी डोकेदुखी बनले आहे. आता हे नागरिक पोलिसात तक्रार करणार आहेत. शहरात अशा प्रकारे भोंदूबाबांकडून फसवणूक झालेल्या नागरिकांची मोठी संख्या असण्याची शक्यता आहे.