शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

बाप्पाच्या स्वागतासाठी सरसावले दुबईकर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2019 7:00 AM

दुबईत स्थायिक असलेल्या भारतीयांची संख्या मोठी आहे. या नागरिकांकडून दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो...

ठळक मुद्देगणेशोत्सवाची जय्यत तयारी : अरब राष्ट्रांत देखील हिंदू भावनांचा आदर 

- मनोहर बोडखे - दौंड : जाती-धर्माची भिंत ओलांडून अरब राष्ट्रांपैकी एक समजल्या जाणाऱ्या दुबईत गणरायाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू झाली आहे. सुमारे दोन हजार गणरायांच्या मूर्ती भारतातून आयात करण्यात आल्या असून येथील बाजारपेठेत विक्रीसाठी त्या उपलब्ध झाल्या आहेत. यासोबतच सजावटीचे साहित्यही बाजारात विक्रीसाठी आले आहे. दुबईत स्थायिक असलेल्या भारतीयांची संख्या मोठी आहे. या नागरिकांकडून दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. दुबईत सध्या शेख महमद यांची राजवट आहे. सर्व कायदे मुस्लिम राजवटीतील असताना देखील सर्वधर्मीयांना त्यांचे धार्मिक सोहळे साजरे करता येतात. पहिले राजे शेख रशीद यांनी सर्व जाती धर्म एकच ही संकल्पना रुजवल्याने  दुबईत २५ मस्जिद, २० चर्च आणि १ गणपतीचे मंदिर आहे. १९५८ मध्ये शेख रशीद या राजाने गणपती मंदिराला जागा दिली होती. त्यानुसार येथील भारतीयांनी मंदिर बांधून गणरायाची प्रतिष्ठापना केली. मंदिराच्यावर शीख धर्मीयांचा गुरुद्वारा असून या मंदिराची देखभाल गुरुदरबार सिंधी संस्थेच्यावतीने केली जाते. या संस्थेचे अध्यक्ष वासू शराफ आहेत. येथील मीना मार्केट, गणपती मंदिर परिसरातील दुकानांमधून गणपतीच्या मूर्ती विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत. येथूनच गणेशभक्त मूर्ती घेऊन जातात आणि गणरायाची प्रतिष्ठापना घरोघरी करतात.  गुरुद्वारातही गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते.  विसर्जन मिरवणुकीचा सोहळाही पाहण्यासारखा असतो. सर्व घरगुती गणपतींचे होडीतून वाजतगाजत विसर्जन केले जाते. यासाठी मंदिराजवळच तळे बांधण्यात आले आहे, असे येथील मूर्तीविक्रेते सनी धनसिंगानी यांनी सांगितले.

 येथील मीना मार्केटमध्ये ठिकठिकाणी गणेशमूर्तींसाठी विक्रीस ठेवल्या जातात. महाराष्ट्राप्रमाणे दुबईतही दगडूशेठ हलवाई आणि लालबागचा राजा या मूर्तींना मोठी मागणी असते. येथील अलआदिक ट्रेडिंगचे विक्रेते तनवीर पालटे यांनी सांगितले.  गणपतीच्या मंदिराच्या बाजूला शिरीनाथ मंदिर असून या मंदिराला १९६० मध्ये दुबईचे राजे शेख रशीद यांनी जागा दिली. दरम्यान, येथील हिंदू बांधवांनी हे १९०२ मंदिर उभारले असल्याचे दुबईस्थित हिंदू कम्युनिटीचे ललित कराणी यांनी सांगितले.

 पाण्याला सोन्याचा भाव, मात्र गणेशभक्तांना मोफत पाणी दुबईत पेट्रोलचा दर कमी तर पाण्याचा दर जास्त आहे. साधारणत: भारतीय चलनात पेट्रोल ६०  रुपयांच्या जवळपास लिटर, तर पाणी २०० रुपये लिटर आहे. पाण्याला सोन्यासारखे भाव असतानाही दुबईतील गणेश मंदिरात गणेशदर्शनासाठी भाविकांच्या रांगा असतात. त्यातच उष्णतेचे बाराही महिने अशा परिस्थितीत मंदिराबाहेर दररोज गणेशभक्तांना मोफत पाणीवाटपाची व्यवस्था केली जाते. 

टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेश महोत्सवDubaiदुबई