शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जन मिरवणुकीत ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’चे बाप्पा मयूररथात होणार विराजमान

By श्रीकिशन काळे | Updated: September 27, 2023 20:30 IST

मानाच्या गणपतीनंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार ...

पुणे : गणरायाचे उद्या वाजतगाजत विसर्जन करण्यात येणार असून, अनेक मंडळांनी विसर्जन मिरवणूकीसाठी खास रथ तयार केले आहेत. यंदा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पासाठी आकर्षक असा मयूररथ तयार करण्यात आला आहे. त्यामधून बाप्पाची गुरूवारी सायंकाळी ७ वाजता विसर्जन मिरवणूक निघेल, अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी दिली.

गेल्या दहा दिवसांपासून गणेशोत्सवाची धामधूम शहरामध्ये पहायला मिळत आहे. आज उत्सवाचा नववा दिवस असून उद्या गुरुवारी विसर्जन मिरवणूक निघणार आहे. हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती’च्या मिरवणुकीबाबत उत्सवप्रमुख पुनीत बालन म्हणाले, ‘‘ यंदाही बाप्पाची जल्लोषात आणि शानदार अशी विसर्जन मिरवणूक काढण्यात येईल. दिवसभरात मानाच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर सायंकाळी ७ वाजता श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात होईल. या मिरवणुकीसाठी आकर्षक पद्धतीने मयूरपंख रथ सजविला आहे. रथासमोर पारंपरिक पद्धतीने ढोल-ताशा पथके जोरदार वादन होईल. या पथकांमध्ये समर्थ पथक, रमणबाग पथक, श्रीराम पथक या तीन पथकांचा समावेश आहे. त्यासोबतच रथासमोर पारंपरिक मर्दानी खेळांचेही प्रात्यक्षिक जगभरातील गणेश भक्तांना आणि पुणेकरांना पहायला मिळेल.’’

‘‘पुण्यातील बाप्पाची विसर्जन मिरवणूक सर्वांसाठी  प्रमुख आकर्षण असते. पुण्याबाहेरील अनेक गणेश भक्त मिरवणूक पहायला येतात. त्यामुळे ती मिरवणूक देखणी, आकर्षक आणि दिमाखदार कशा प्रकारे होईल, असा सर्वच गणेश मंडळांचा प्रयत्न असतो. आमचाही असाच प्रयत्न आहे. अधिकाधिक गणेश भक्तांनी या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊन आनंद घ्यावा आणि बाप्पाला भक्तीभावाने निरोप द्यावा. - पुनीत बालन, विश्वस्त व उत्सवप्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड