शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

‘बाप्पा, बुद्धी दे, शिक्षण हक्काची जाण दे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 03:26 IST

वादग्रस्त विधानावरून खळबळ; आम आदमी पार्टीतर्फे प्रकाश जावडेकरांविरोधात निदर्शने

पुणे : शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे मोफत शिक्षण सुविधा पुरवणे ही शासनाची जबाबदारी असतानाही शाळांनी सरकारकडे भिकेचा कटोरा घेऊन येण्यापेक्षा शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडे आर्थिक सहाय्य मागावे, असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले होते. त्याचा निषेध करण्यासाठी आम आदमी पार्टीतर्फे बालगंधर्व चौकात निदर्शने करण्यात आली. बाप्पा, जावडेकरांना बुद्धी दे, शिक्षण हक्काची जाण दे, अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. हम अपना हक माँगते, नही किसीसे भीख माँगते, भीख नाही, हक्क द्या, दिल्ली मॉडेल शिकून घ्या अशा घोषणांनी निषेध व्यक्त करण्यात आला. पदाधिकारी मुकुंद किर्दत, सैद अली, आनंद अंकुश व अनेक कार्यकर्ते सामील झाले होते.सरकारची जबाबदारी असलेल्या शैक्षणिक सुविधांसाठी शासनाकडे मागितलेले अनुदान, सोई ही भीक नव्हे. कटोरा घेऊन शाळा येतातही भाषा स्वत:ची जबाबदारी नाकारणारी, असभ्य आणि सत्तेचा माज दर्शवणारी आहे, असे आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी म्हटले. जावडेकर यांच्या घराबाहेर आंदोलनाकरिता विविध संघटना, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. सुरक्षेकरिता पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.माझे शब्द मागे घेतो... : प्रकाश जावडेकरसरकार शिक्षणावर खर्च करणार नाही आणि माजी विद्यार्थ्यांनीच खर्च करावा, असे म्हणण्याचा माझा मुळीच अर्थ नव्हता. यापुढे सरकार शिक्षणावर अधिकाधिक खर्च करेल. गेल्या चार वर्षांत मोदी सरकारने ७० टक्के शिक्षणावरील तरतूद वाढविली आहे. माजी विद्यार्थ्यांनीसुद्धा आपल्या शाळा, कॉलेज या संस्थांच्या विकासामध्ये योगदान केले पाहिजे.हा भाषणाचा मूळ आशय आहे. शिक्षणासाठी मदत करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. ज्ञान प्रबोधिनी शाळा चालविण्यासाठी त्यांचे माजी विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर मदत करतात, ही चांगली घटना आहे. याचे उदाहरण देऊन वक्तव्य केले होते. भाषणात वापरलेला भीकेचा कटोरा हा शब्द चुकीचा असून, तो मी मागे घेत असल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले.जावडेकरांविरोधात पोस्टरबाजीपुणे : केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने रविवारी (दि. १६) शहरात पोस्टरबाजी केली. मनविसेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी फर्ग्युसन महाविद्यालय, स. प. महाविद्यालय, खंडूजी बाबा चौक यांसह शहरात विविध ठिकाणी सुमारे २०० पोस्टर लावले आहेत. पोस्टरवर जावडेकर यांच्या वक्तव्याचा उल्लेख करण्यात आला आहे. हातात कटोरा आणि झोळी घेतलेल्या वेषात जावडेकर यांना दाखविण्यात आले असून त्यांच्या मागे मराठी शाळेतील विद्यार्थी दाखविण्यात आले आहेत. त्याखाली ‘जावडेकर गुरुजींना, भविष्यात शाळा-विद्यार्थी भीक मागायला लावणार,’ असे लिहिण्यात आले आहे. त्यामुळे ही पोस्टरबाजी चर्चेचा विषय ठरली आहे.

टॅग्स :Prakash Javadekarप्रकाश जावडेकरBJPभाजपा