शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

दौंडमध्ये तृतीयपंथींच्या वाड्यात गौराईबरोबरच बाप्पा 'निसर्गाच्या सानिध्यात' विराजमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2021 21:14 IST

माणसाने निसर्गाची जोपासना करावी असा संदेश देणारा देखावा गौरी गणेशा समोर साकारला आहे

ठळक मुद्दे तृतीयपंथीयांनी सामाजिक संदेश देण्याचा केलेला प्रयत्न हा संपूर्ण यवत पंचक्रोशीतील गावांमध्ये चांगलाच झाला लोकप्रिय

यवत :  माणसाच्या आयुष्यात निसर्गातील ऑक्सिजनची आवश्यकता आणि यासाठी माणसाने निसर्गाची जोपासना करावी असा संदेश देणारा देखावा यवत येथील तृतीयपंथी वाड्यात गौरी गणेशा समोर साकारला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र विविध नियमांसह गौरी गणेश उत्सव साजरा केला जात आहे. यवत मधील तृतीयपंथी वाड्यात साजरा होणारा गौरी गणपती उत्सव विशेष प्रसिद्ध आहे.

यवत (ता.दौंड) येथील तृतीयपंथी वाड्यात दीपा गुरू रंजिता नायक यांनी गौरीगणपती उत्सव सुरू करून त्यामधून सामाजिक संदेश देण्याचा केलेला प्रयत्न हा संपूर्ण यवत पंचक्रोशीतील गावांमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला आहे. मागील अनेक वर्षांपासून तृतीयपंथीयांचा येथे वाडा आहे. तृतीयपंथी बदलले तरी येथे येणाऱ्या प्रत्येक तृतीयपंथीयांच्या प्रमुखाने गावातील सर्व नागरिकांशी जिव्हाळ्याचे संबंध जोपासले आहेत. यामुळे इतरत्र सर्वत्र उपेक्षित म्हणून गणले जाणारे तृतीयपंथीय यवतमध्ये मात्र, सर्वांशी मिळून मिसळून वागत असल्याने त्यांना नेहमी आदराची वागणूक गावात मिळत असते.

गौरी गणपती उत्सव सुरू केल्यानंतर त्यांच्या आदरात आणखी भर पडली आहे. त्यांनी गौरी गणपतीला केलेली सजावट पाहण्यासाठी केवळ गावातीलच नाही तर आजूबाजूच्या गावातील महिला व नागरिक काल मोठ्या प्रमाणावर आले होते. गौरी गणपतीला त्यांनी केवळ आकर्षक सजावट व देखावा न करता सामाजिक संदेश देण्यासाठी सर्वधर्म समभाव, मुलगी वाचवा मुलगी शिकवा यासारखे संदेश त्यांनी मागील काही वर्षात साकारले आहेत.

मुंबई मधील सेलिब्रिटीस पासून ते नागपूर मधील गडकरी वाड्यात साजरा केल्या जाणाऱ्या गणपती उत्सवाची प्रसिद्धी सर्वच प्रसिद्धी माध्यमांमधून होत असते. मात्र, पुणे जिल्ह्यातील यवतमध्ये तृतीयपंथी वाड्यात साजरा केला जाणार गौरी गणपती उत्सव मात्र अद्याप पर्यंत यापासून उपेक्षित होता. मात्र मागील काही वर्षांत विशेष प्रसिद्ध झाला आहे.

टॅग्स :daund-acदौंडGanesh Mahotsavगणेशोत्सवganpatiगणपतीGanpati Festivalगणेशोत्सव