पुणे : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना बेकायदा कर्ज दिल्याच्या आरोपावरून बँक आॅफ महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांना अटक करून त्यांच्या पोलीस कोठडीबाबत आग्रह असलेले पोलीसच आता या कर्मचाºयांना जामीन देण्यास हरकत नसल्याचे म्हणणे न्यायालयात मांडत आहेत. जामिनास हरकत नसल्याचे लेखी देऊनही जामिनास विरोध असल्याचा युक्तिवाद विशेष सरकारी वकील करीत आहेत.बँक आॅफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार गुप्ता, माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुशील मुहनोत आणि विभागीय व्यवस्थापक नित्यानंद देशपांडे यांच्या जामीन अर्जावर पोलिसांकडून लेखी म्हणणे गुरुवारी न्यायालयात सादर करण्यात आले.
बॅँक आॅफ महाराष्ट्र प्रकरणी जामिनास सरकारचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 04:46 IST