शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बॅँक आॅफ महाराष्ट्रच्या तीन अधिकाऱ्यांना जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 19:18 IST

समानतेच्या आधारावर उर्वरित तीन अधिकाऱ्यांना जामीन द्यावा, तसेच त्यांच्याकडील तपास पूर्ण झाला असल्याचे देखील पोलिसांनी दिलेल्या ‘से’मध्ये नमूद करण्यात आले होते.

ठळक मुद्देप्रत्येकी पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर जामिनाबाबत पोलीस आणि सरकारी वकिलांमध्येच ताळमेळ नसल्याचे स्पष्ट सर्व नाट्यात्मक घडामोडीनंतर तीनही आरोपींना अखेर जामीन

पुणे : अधिकारांचा गैरवापर करून बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांच्या डीसकेडीएल कंपनीला कर्ज दिल्याच्या आरोपावरून कोठडीत असलेले बँक आॅफ महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार गुप्ता, माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुशील मुहनोत, विभागीय व्यवस्थापक नित्यानंद देशपांडे यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला.  जामिनाबाबत पोलीस आणि सरकारी वकिलामध्ये असलेल्या मतभेदामुळे गुरुवारी उशीराने या अर्जावर युक्तिवाद झाला. त्यामुळे न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. त्यानुसार आज बँक आॅफ महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार गुप्ता, माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुशील मुहनोत आणि विभागीय व्यवस्थापक नित्यानंद देशपांडे यांची तपासात सहकार्य करण्यासह इतर अटींवर न्यायालयाने जामीनावर मुक्कता केली. बॅँके चे व्यवस्थापकीय संचालक रविंद्र मराठे यांना बुधवारी काही अटी आणि शर्थींवर जामीन देण्यात आला. त्यामुळे समानतेच्या आधारावर गुप्ता, मुहनोत आणि देशपांडे या तीन अधिकाऱ्यांना जामीन मिळावा म्हणून बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांनी अर्ज केला होता. संबंधिकत अधिकाऱ्यांकडील तपास पूर्ण झाला असल्याचेदे पोलिसांनी दिलेल्या सेमध्ये नमूद करण्यात आले होते. सध्या रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडून बँक आॅफ महाराष्ट्राच्या व्यवस्थापकीय संचालकपदाच्या मुलाखतीसाठी गुप्ता यांना बोलविले जाणार आहे. त्यामुळे गुप्ता, मुहनोत, घाटपांडे यांना ही जामीन मंजूर करण्यात यावा, अशी विनंती अ‍ॅड. निंबाळकर यांनी न्यायालयाकडे केली होती. दरम्यान जामिनास हरकत नसल्याचे लेखी देवूनही जामिनाला विरोध असल्याचा युक्तीवाद याप्रकरणी नियुक्त विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रविण चव्हाण यांनी केला होता. मात्र, पोलिसांच्या सेमध्ये सदर अर्जदार आरोपींकडे कागदपत्रे दाखवून पुरेसा तपास करण्यात आलेला आहे. उपरोक्त कारणांचा विचार करत सदर जामीन अर्जावर न्यायाच्या दृष्टीने योग्य त्या अटी व शर्तीवर आदेश होण्यास विनंती आहे, असे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे जामिनाबाबत पोलीस आणि सरकारी वकिलांमध्येच ताळमेळ नसल्याचे स्पष्ट झाले होते. या सर्व नाट्यात्मक घडामोडीनंतर तीनही आरोपींना अखेर जामीन मिळाला. 

टॅग्स :PuneपुणेD.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीBank Of Maharashtraबँक ऑफ महाराष्ट्रCourtन्यायालय