शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे ससून रुग्णालयात दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2018 10:31 IST

डी. एस. कुलकर्णी यांच्या कंपनीला नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी बुधवारी (20 जून) अटक केलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक रवींद्र मराठे यांना मध्यरात्री ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पुणे - डी. एस. कुलकर्णी यांच्या कंपनीला नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी बुधवारी (20 जून) अटक केलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक रवींद्र मराठे यांना मध्यरात्री ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. डी. एस. कुलकर्णी यांच्या डीएसकेडीएल या कंपनीला आपल्या अधिकाराचा गैरवापर करुन कर्ज मंजूर केल्याप्रकरणी पुणे शहर पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी दुपारी रवींद्र मराठे यांच्यासह बँकेचे चार अधिकारी, माजी अध्यक्ष आणि चार्टड अकाऊंटंट यांना अटक केली़ त्यानंतर त्यांना शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात नेण्यात आले होते. न्यायालयाने सर्वांना २७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्यानंतर त्यांना पुन्हा पोलीस आयुक्तालयात आणण्यात आले़ त्यानंतर रात्री त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.

तेथे जेवण घेतल्यानंतर मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास रवींद्र मराठे यांनी आपल्या छातीत दुखत असल्याची तक्रार केली़ तेव्हा तेथील पोलिसांनी ही बाब तातडीने वरिष्ठ पोलीस अधिका-यांना कळविली. त्यांच्या वयाचा विचार करता पोलिसांनी तातडीने त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले. याबाबत ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे यांनी सांगितले की, रवींद्र मराठे यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दम्याचा त्रास असल्याचे त्यांनी डॉक्टरांना सांगितले. तपासणीत त्यांचा बी.पी. ही वाढल्याचे दिसून आले आहे. आवश्यक त्या सर्व वैद्यकीय तपासणी करण्यात येऊन उपचार करण्यात येत असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे ससून रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले़

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीbankबँक