शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शहरात रस्त्यावर सिलेंडर वापरण्यास बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 20:54 IST

स्वयंपाकाच्या किंवा व्यावसायिक गॅस सिलेंडरचा वापर करून रस्त्यावरच खाद्यपदार्थांची विक्री करतात. महापालिकेकडून अशा विक्रेत्यांचे सिलेंडर जप्त करण्यास सुरूवात करण्यात आली आहे .

ठळक मुद्देशहरातून ७०० सिलेंडर जप्त: ५ हजार रूपयांचा दंड करणारबहुसंख्य भागांमध्ये गेल्या काही वर्षात सकाळी व सायंकाळीही रात्री उशिरापर्यंत खाद्यपदार्थांची विक्री सुरू

पुणे: स्वयंपाकाच्या किंवा व्यावसायिक गॅस सिलेंडरचा वापर करून रस्त्यावरच खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांचे सिलेंडर जप्त करण्यास महापालिकने सुरूवात केली आहे. अशा प्रकारे सिलिंडरचा वापर करणे धोकादायक असल्याने ही कारवाई सुरू करण्यात आली असून आतापर्यंत ७०० सिलेंडर जप्त करण्यात आल्या आहेत.महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी ही माहिती दिली. राज्य सरकारचेच तसे आदेश असल्याचे त्यांनी सांगितले. सिलेंडरचा असा वापर केल्यास ५ हजार रूपये दंडाची शिक्षा आहे. शहराच्या बहुसंख्य भागांमध्ये गेल्या काही वर्षात सकाळी व सायंकाळीही रात्री उशिरापर्यंत खाद्यपदार्थांची विक्री सुरू असते. जागेवरच पदार्थ तयार केले जातात. त्यासाठी स्वयंपाकाचा किंवा व्यावसायिक गॅस वापरण्यात येतो. यात टाकीचा स्फोट होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे ही कारवाई करण्यात येत आहे असे जगताप यांनी सांगितले.जप्त केलेले सिलेंडर महापालिकेने वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले आहेत. दंडाची रक्कम जास्त असल्याने बहुसंख्य गाडीचालक सिलेंडर नेण्यासाठी आलेलेच नाहीत अशी माहिती त्यांनी दिली. त्यामुळे आणखी काही दिवस वाट पाहून सर्व सिलेंडर्स महापालिका त्यात्या कंपन्यांकडे जमा करणार आहे असे ते म्हणाले. दंड कमी करता येणार नाही, कारण कमी केला की व्यावसायिक पुन्हा त्या जागेवर व्यवसाय सुरू करतात, त्यामुळे कारवाई सुरूच राहणार आहे असे त्यांनी सांगितले. महापौर मुक्ता टिळक यांनी जप्त सिलेंडर्स एकत्रित ठेवताना अतिक्रमण विभागाने काळजी घ्यावी अशी सुचना केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेCylinderगॅस सिलेंडरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाfoodअन्न