शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयीन कामकाजाविरुद्ध बंद पुकारल्यास वकिलांवर येणार बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 19:44 IST

गेल्या काही दिवसांपासून वकिलांनी काम बंद आंदोलन पुकारल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. खंडपीठाच्या मागणीसाठी पुण्यातील वकिलांनीतर तब्बल तीन आठवडे आंदोलन केले होते.

ठळक मुद्देबॉम्बे हायकोर्ट अ‍ॅपेलेट व ओरिजनल साईड रूल्समध्ये नुकतेच काही बदल व्यसनाधीन आढळल्यासही वकिलांवर बंदीची कारवाई होणार

पुणे : न्यायालयीन कामकाजाविरुद्ध बंद पुकारला किंवा कोणालाही न्यायालयीन कामकाजापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केल्यास अशा वकिलांवर आता कोणत्याही न्यायालयात वकिली करण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. त्यामुळे आता कोणत्याही मुद्यांवर काम बंद आंदोलन करणे वकिलांना महागात पडणार आहे.       न्यायालयात वकिलांच्या वर्तनाबाबत असलेल्या बॉम्बे हायकोर्ट अ‍ॅपेलेट व ओरिजनल साईड रूल्समध्ये नुकतेच काही बदल करण्यात आला आहे. नव्याने अस्तित्वात आलेल्या नियम ९ अ नुसार जर एखाद्या वकिलाने न्यायाधीशांच्या नावाने किंवा न्यायाधीशांद्वारे अनुकूल निकाल मिळवण्याच्या बहाण्याने अशिलांकडून पैसे उकळले, न्यायालयीन कागदपत्रे व अभिलेख्यांमध्ये छेडछाड केली, न्यायालयाचे नियमीत कामात अडथळा आणला, न्यायाधीश व न्यायव्यवस्थेबाबत अवमानकारक वर्तन, लेखन अथवा भाष्य केले तसेच न्यायसंस्थेवरील नागरिकांच्या मनातील विश्वासाला तडा जाईल, असे कोणतेही कृत्य केले तर संबंधित वकिलांवर कोणत्याही न्यायालयात वकिली करण्यावर बंदी आणण्याची तरतूद या बदललेल्या नियमांमध्ये केली आहे.           गेल्या काही दिवसांपासून वकिलांनी काम बंद आंदोलन पुकारल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. खंडपीठाच्या मागणीसाठी पुण्यातील वकिलांनीतर तब्बल तीन आठवडे आंदोलन केले होते. नुकतेच एका वकिलांवर झालेल्या खूनी हल्ल्याचा निषेध म्हणून एक दिवस बंद पुकारल्यात आला होता. त्याचा परिमाण न्यायालयीन कामकाजावर झाला होता. त्यामुळे वकिलांनी बंद पुकारला, न्यायालयात असभ्य वर्तन केले, वकिली व्यावसायास अशोभनीय कृत्य केले अथवा न्यायालयात दारू पिऊन किंवा नशेल्या पदार्थांचे सेवन केलेले आढळल्यासही वकिलांवर बंदीची कारवाई होणार आहे.      उच्च न्यायालयात असा प्रकार घडल्यास संबंधित न्यायमूर्ती तेथील मुख्य न्यायमूर्तींच्या निदर्शनास ही बाब आणून देतील. त्यानंतर संबंधित वकिलास व्यक्तिश: नोटीस बजावण्यात येऊन, अशा प्रकरणाची दोन महिन्यात चौकशी करून तो दोषी आढळल्यास त्या वकिलांवर बंदीचा आदेश करू शकतील. उच्च न्यायालया व्यतिरिक्त जिल्हा व तालुका न्यायालये अथवा न्यायाधिकरणांसमोर असा प्रकार घडल्यास तेथील पीठासीन अधिकारी संबंधित जिल्ह्याच्या प्रमुख जिल्हा न्यायाधिशांकडे अशा प्रतिबंधित कृत्याचा अहवाल पाठवतील. संबंधित वकिलाची चौकशी करून बंदीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार प्रमुख जिल्हा न्यायाधिशांना देण्यात आलेला आहे.................................बंदीला देता येणार नाही आव्हानयाबाबतचा आदेश २६ आॅक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने प्रसिद्ध केला आहे. तेव्हापासून ते नियम लागू झाल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. या नियमांतर्गत बंदी आदेशाविरुद्ध कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येणार नाही, अशी तरतूद या नियमात केली आहे.

टॅग्स :PuneपुणेadvocateवकिलCourtन्यायालय