शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
3
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
4
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
5
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
7
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
8
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
9
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
11
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
14
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
15
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
16
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
17
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
18
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
19
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
20
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश

एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 07:51 IST

प्रवेश घेतला नाही तरी अन् प्रवेश निश्चित केला तरी गैरसाेयीचे ठरण्याची भीती विद्यार्थ्यांच्या मनात

पुणे : बीएएमएस, बीएचएमएस आणि बीयूएमएस प्रवेशासाठीच्या कॅप फेरी तीनचा निकाल शनिवारी जाहीर झाला; परंतु एमबीबीएस आणि बीडीएस प्रवेशाच्या कॅप फेरी तीनचा निकाल जाहीर हाेण्याआधीच सदर निकाल हाती आल्याने विद्यार्थी गाेंधळात आहेत. कारण, प्रवेश घेतला नाही तरी अन् प्रवेश निश्चित केला तरी गैरसाेयीचे ठरण्याची भीती विद्यार्थ्यांच्या मनात आहे. 

सीईटी कक्षाच्या माहितीनुसार, एमबीबीएस कॅप फेरी ३ साठी सरकारी महाविद्यालयांमध्ये १३९ जागा आणि खासगी महाविद्यालयांमध्ये (राज्य कोटा) ३०३ जागा उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त २९७ संस्थात्मक कोट्यातील एमबीबीएस जागादेखील उपलब्ध आहेत; पण राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या आयुक्तांनी १७ ऑक्टोबर २०२५ रोजी जारी केलेल्या सूचना २२ नुसार कॅप फेरी-३ च्या वाटप केलेल्या जागेसाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे अनिवार्य आहे. कारण, सदर उमेदवारांचा पुढील फेरीसाठी विचार केला जाणार नाही. एमबीबीएसची संधी न घेता उपलब्ध बीएएमएस किंवा बीएचएमएसला प्रवेश घ्यावा लागणार आहे

नेमका कुठे प्रवेश घ्यावा याचा संभ्रम  

बीएएमएस अभ्यासक्रमाच्या कॅप फेरी-३ चा निकाल एमबीबीएस प्रवेशाच्या कॅप फेरी-३ पूर्वी जाहीर केल्याने हा गाेंधळ निर्माण झाला आहे.कॅप फेरी-३ मध्ये बीएएमएस कॉलेज वाटप केल्यास सदर उमेदवार पुढील कोणत्याही फेरीत सहभागी होण्यास अपात्र ठरेल, या निर्णयाबाबत विद्यार्थी, पालक नाराजी व्यक्त करीत आहेत. 

विद्यार्थी म्हणतात...

स्पर्धा प्राधिकरण या समस्येची दखल घेईल का?

विद्यार्थ्यांना योग्य संधी देईल का? 

बीएएमएससाठी कॅप फेरी-४ मध्ये सर्व विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची परवानगी दिली जाईल का? 

एका पालकाने सांगितले की, सरकारी बीएएमएस महाविद्यालयांमध्ये अव्वल क्रमांकावर असलेल्या उच्च क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीत एमबीबीएस मिळण्याची शक्यता आहे. तथापि, एमबीबीएस निकाल उशिरा लागल्याने, त्यांनी रिक्त केलेल्या जागा तिसऱ्या फेरीत काही बीएएमएस महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या उच्च क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार नाहीत. एमबीबीएस प्रवेशाच्या निकालांना विलंब हाेणे, यात विद्यार्थ्यांचा दोष नाही, एमबीबीएस प्रवेशामुळे रिक्त झालेल्या बीएएमएस जागा फक्त उच्च क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाच उपलब्ध असाव्यात. कारण एमबीबीएस ही सर्वोच्च प्राधान्य शाखा  आहे. विलंबामुळे उच्च क्रमांकाच्या पात्र विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये -एक पालक

English
हिंदी सारांश
Web Title : MBBS Aspirants Confused as AYUSH Admissions Start Before MBBS Results.

Web Summary : Students are confused as AYUSH admissions started before MBBS results. Students fear losing MBBS chances by securing AYUSH seats. Parents demand fairness for higher-ranked students.
टॅग्स :doctorडॉक्टरPuneपुणे