शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

तळजाई टेकडीवर पाच एकरमध्ये बांबूचे उद्यान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 02:05 IST

तळजाई टेकडीवरील सुमारे पाच एकर जागेमध्ये लवकरच बांबूचे विशेष उद्यान उभारण्यात येणार आहे.

पुणे : तळजाई टेकडीवरील सुमारे पाच एकर जागेमध्ये लवकरच बांबूचे विशेष उद्यान उभारण्यात येणार आहे. बांबू वनस्पतीची बहुउपयोगिता पुढील पिढीला समजावी, हा उद्देश ठेवून हे उद्यान पुढील दोन वर्षांत बहरेल, असा विश्वास पुणे महापालिकेचे उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी दिला.तळजाई टेकडी पुणे शहराला पर्यावरणदृष्ट्या वरदान ठरलेली आहे. वनविभागाच्या शेकडो एकर जागेमध्ये वनसंपदा टिकून असून ती वृद्धिंगत करण्यासाठी वनविभाग, महापालिका आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांचे योगदान लाभले आहे. तसेच या टेकडीचा बराचसा भाग हा महापालिकेच्या ताब्यात असून महापालिका आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी पर्यावरणप्रेमींच्या मदतीने तिचे जतन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. आॅक्सिजन पार्क, स्मृतीवन अशा संकल्पना राबवून नवनवीन वृक्षराजींची त्यामध्ये भर घातली असून महापालिकेने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. नुकतेच येथील पठारावर क्रिकेट स्टेडियमसोबत ओपन जिम, जॉगिंग ट्रॅकचीही निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये लवकरच एका बांबू उद्यानाची भर पडणार आहे.सध्या क्रिकेट स्टेडियम व परिसरातील झाडे जगविण्यासाठी आंबिल ओढ्यातील ग्रे वॉटर वापरण्यात येते. बांबू उद्यान विकसित करण्यासाठीही पाण्याची गरज भासणार आहे. सहकारनगर येथे कात्रज तलावातून निघालेला उच्छ्वास आहे. या उच्छ्वासाचे पाणी पंपिंग करून टेकडीवर पाण्याची टाकी बांधून तेथे घेण्यात येणार आहे.दैनंदिन जीवनासाठी बहुउपयोगीयासंदर्भात उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी सांगितले, की कै. स. दू. शिंदे स्टेडियमसमोरील पाच एकर जागेमध्ये हे बांबू उद्यान उभारण्यात येणार आहे. दैनंदिन जीवनातील वापराच्या दृष्टीने बांबू हे बहुउपयोगी आहे. याची माहिती आणि ज्ञान पुढील पिढीला व्हावी, हा यामागील उद्देश आहे.जगभरात बांबूच्या सुमारे सतराशे प्रजाती आहेत. परंतु आपल्याकडील वातावरणात साधारण १०८ प्रजातींची लागवड होऊ शकते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात साधारण २२ प्रजातींची रोपे खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यानंतर या उद्यानामध्ये पॅगोडा, सीमाभिंतही बांबूचीच असेल. तसेच बांबूच्या विविध प्रजाती आणि उपयोगाची माहितीही देण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे अडीच कोटी रुपयांचा खर्च असून या कामासाठी दोन ते अडीच वर्षे लागतील.

टॅग्स :Puneपुणे