शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बालवाडी शिक्षिकांना ८ ते १० हजार रुपये मानधन वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 16:20 IST

मराठी, उर्दू, इंग्रजी व कन्नड माध्यमांच्या ५१५ बालवाडी शिक्षिका आणि ४२३ बालवाडी सेविकांना मानधन वाढीचा लाभ होणार आहे.

ठळक मुद्देस्थायी समितीच्या बैठकीत मान्यतापंधरा वर्षांहून कमी सेवा झालेल्या बालवाडी शिक्षिकांना दहा हजार रुपये व सेविकांना साडेसात हजार रुपये मानधनदर दोन वर्षांनी १० टक्के दरवाढ देण्याचे प्रस्तावित

पुणे:  महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाकडील बालवाडी शिक्षिका व सेविका यांना सरसकट वेतनवाढ न देता त्यांची सेवा विचारात घेऊन पंधरा वर्षांपेक्षा कमी सेवा झालेले कर्मचारी व पंधरा वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेले कर्मचारी अशी वर्गवारी करण्यात करून पंधरा वर्षांहून कमी सेवा झालेल्या बालवाडी शिक्षिकांना दहा हजार रुपये व सेविकांना साडेसात हजार रुपये मानधन देण्याचे ठरविण्यात आले. तसेच पंधरा वर्षांहून अधिक सेवा झालेल्या शिक्षिकांना अकरा हजार पाचशे रुपये व सेविकांना साडेआठ हजार मानधन देण्यास मान्यता देण्यात आली. दर दोन वर्षांनी १० टक्के दरवाढ देण्याचे प्रस्तावित करण्यात आले, अशी स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली.सर्व सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा पाया मजबूत व्हावा हा उद्देश ठेवून या बालवाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. परंतू तेथे शिक्षण देणारे शिक्षक आणि सेविकांना अत्यल्प मानधन दिले जात असल्याने सर्वसाधारण सभेमध्ये सर्वच पक्षीय सदस्यांनी प्रशासनावर टीकेची झोड उठवत शिक्षिकांचे वेतन वाढविण्यासोबतच धोरण ठरवावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने खास धोरण करून स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवले होते. याबाबत मुळीक यांनी सांगितले की, सेवकांची वीस वर्षांहून कमी सेवा झालेले कर्मचारी व वीस वर्षांहून अधिक सेवा झालेले कर्मचारी असे गट प्रशासनाने केले होते. स्थायी समितीने उपसुचनेद्वारे ही मर्यादा पंधरा वर्षे केली. उपसुचनेद्वारे प्रशासनाने निश्चित केलेल्या मानधनात पाचशे रुपयांची वाढ देण्यास मान्यता देण्यात आली. नगरसेवक सुनील कांबळे, दिलीप वेडे-पाटील, आबा तुपे, दिलीप बराटे यांनी ही उपसुचना दिली होती.या कर्मचा-यांना दहा नैमित्तिक रजा मिळणार आहेत, १८० दिवस प्रसुती रजा, शहरी गरीब योजनेच्या सभासदत्वासाठी उत्पन्नाची अट शिथिल, गाडीखान्यातून विनामूल्य औषधे, मनपा रुग्णालयात बिाह्य व आंतररुग्ण विभागातून विनामूल्य उपचार व औषधे आदी सुविधा मिळणार आहेत.मराठी, उर्दू, इंगह्यजी व कन्नड माध्यमांच्या ५१५ बालवाडी शिक्षिका आणि ४२३ बालवाडी सेविकांना मानधन वाढीचा लाभ होणार आहे. पुणे महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाकडील बालवाडी शिक्षिका व सेविका यांच्या मानधन, रजा व वैद्यकीय सुविधा मिळण्याबाबत महापालिका कामगार युनियनने महापौर मुक्ता टिळक यांना १७ जुलै रोजी निवेदन दिले होते.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMukta Tilakमुक्ता टिळक