शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

शेवगाव येथे जानेवारीत रंगणार बालकुमार साहित्य संमेलन; चित्रकार ल. म. कडू अध्यक्षपदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 15:27 IST

ग्रामीण भागातील मुलांमध्ये साहित्याची अभिरुची निर्माण व्हावी, बालसाहित्याचा समृद्ध वारसा त्यांच्यापर्यंत पोचावा, या उद्देशाने २७वे मराठी बालकुमार साहित्य संमेलन अहमदनगरमधील शेवगाव येथे आयोजित करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे भारदे साक्षरता प्रसारक मंडळातर्फे शेवगाव येथे बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजनतीन दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालनापासून विविध स्पर्धांत मुलांचाच सहभाग

पुणे : ग्रामीण भागातील मुलांमध्ये साहित्याची अभिरुची निर्माण व्हावी, बालसाहित्याचा समृद्ध वारसा त्यांच्यापर्यंत पोचावा, या उद्देशाने २७वे मराठी बालकुमार साहित्य संमेलन अहमदनगरमधील शेवगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. अमरेंद्र-भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे आयोजित संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ बालसाहित्यिक आणि चित्रकार ल. म. कडू यांची निवड करण्यात आली आहे. रमेश भारदे स्वागताध्यक्षपद भूषवणार आहेत.गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या भारदे साक्षरता प्रसारक मंडळातर्फे शेवगाव येथे बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाची कार्यक्रमपत्रिका लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा डॉ. संगीता बर्वे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपाध्यक्ष माधव राजगुरु, कार्यवाह मुकूंद तेलीचेरी, सहकार्यवाह सुनील महाजन, आयोजक संस्थेचे प्रतिनिधी हरीश भारदे, उमेश घेवरीकर, भाऊसाहेब शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. दोन वर्षांपूर्वी मारुंजी येथे २६वे बालकुमार साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्था बरखास्त होऊन अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेची स्थापना झाली. या संस्थेतर्फे २७ वे मराठी बालकुमार साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.तीन दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालनापासून विविध स्पर्धा, कार्यक्रमांमध्ये मुलांचाच सहभाग असणार आहे. राज्यभरातील शाळांंशी संपर्क साधून कथाकथन, कविता स्पर्धांसाठी लेखन मागवण्यात येणार असून, विजेत्यांना संमेलनात गौरवले जाणार आहे. संमेलनासाठी राज्याचे सांस्कृतिक आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना उपस्थित राहण्याबाबत विनंतीचे पत्र पाठवण्यात आले आहे. संमेलनासाठी तुर्तास शासनाकडे कोणत्याही अनुदानाची मागणी करणार नसल्याचे महाजन यांनी सांगितले. 

टॅग्स :literatureसाहित्यPuneपुणेAhmednagarअहमदनगर