शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

बालभारतीने घ्यावा ‘दुर्गापर्व’ पुरवणीचा आधार; पुणे शहर युवक काँग्रेसची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 3:51 PM

इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘लोकमत’ने प्रसिध्द केलेल्या ‘दुर्गापर्व’ या विशेष पुरवणीने त्यांचा संपूर्ण जीवनपट उलगडला आहेत.

ठळक मुद्देपुरवणीतून उलगडण्यात आले इंदिरा गांधींचा मुत्सद्दीपणा, दुरदृष्टी, निर्णयक्षमता असे विविध पैलु मंत्री व अधिकाऱ्यांना भेटून आक्षेपार्ह मजकूर वगळण्याची मागणी

पुणे : इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘लोकमत’ने प्रसिध्द केलेल्या ‘दुर्गापर्व’ या विशेष पुरवणीने त्यांचा संपूर्ण जीवनपट उलगडला आहेत. त्यामुळे ‘बालभारती’ने अभ्यासक्रमात त्यांच्याविषयी दिलेल्या अपुऱ्या व बदनामीकारक माहितीत बदल करण्यासाठी ‘दुर्गापर्व’ या पुरवणीचा आधार घ्यावा, अशी मागणी शहर युवक काँग्रेसने केली आहे. ‘लोकमत’च्या ‘दुर्गापर्व’ या विशेष पुरवणीचे सर्वत्र कौतुक होत आहे. इंदिरा गांधींचा मुत्सद्दीपणा, दुरदृष्टी, निर्णयक्षमता असे विविध पैलु या पुरवणीतून उलगडण्यात आले आहेत. त्यांच्या या गुणांवर राजकारणासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोहोर उमटवली आहे. युवक काँग्रेसच्या वतीने ही पुरवणी गुरूवारी ‘बालभारती’ला भेट देण्यात आली. यावेळी शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष विकास लांडगे, प्रवक्ते हनुमंत पवार, संतोष पाटोळे, राहूल सिरसाठ, वाहिद निलगर, विशाल मलके, विशाल जाधव, प्रताप शिळीमकर, जीवन पिसाळ, हनान पंडित आदी उपस्थित होते. युवक काँग्रेसने या पुरवणीविषयी ‘लोकमत’चे आभारही मानले.‘बालभारती’च्या इयत्ता नववीच्या पुस्तकात इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्याविषयी बदनामीकारक व अपुरी माहिती देण्यात आली आहे. इंदिरा गांधी यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण कामे केली. मात्र, पुस्तकामध्ये केवळ त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याचे श्रेत्र मात्र त्यांना देण्यात आलेले नाही. याविरोधात काँग्रेसने आंदोलनही केले. मंत्री व अधिकाऱ्यांना भेटून आक्षेपार्ह मजकूर वगळण्याची मागणी करण्यात आली. इंदिरा गांधी यांच्या कार्याला पुस्तकामध्ये पुर्ण न्याय मिळाला नाही. पण ‘लोकमत’च्या विशेष पुरवणीमध्ये त्यांच्या सर्व गुण उलगडले आहेत. त्यामुळे ही पुरवणी ‘बालभारती’ला भेट देण्यात आली. ‘बालभारती’च्या संपादकीय मंडळाने या पुरवणीचा अभ्यास करून त्याचा आधार घेत त्यानुसार पुस्तकात योग्य बदल करावेत, हा यामागचा उद्देश आहे, असे लांडगे यांनी सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेसIndira Gandhiइंदिरा गांधीRajiv Gandhiराजीव गांधी