शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
3
ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
4
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
5
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
6
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
7
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
8
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
9
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
10
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
11
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
12
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
13
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
14
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
15
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
16
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
17
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
18
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
19
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'

...अखेर बाळासाहेब थोरात पुण्याच्या काँग्रेस भवनमध्ये आले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 17:00 IST

फक्त तक्रारी करू नका, सुचनाही करा, त्याची नक्की दखल घेऊ अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी सायंकाळी पक्षाच्या शहर संघटनेतील पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केले.

पुणे : फक्त तक्रारी करू नका, सुचनाही करा, त्याची नक्की दखल घेऊ अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी सायंकाळी पक्षाच्या शहर संघटनेतील पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केले. संघटनेचे काम करताना पदाधिकाऱ्यांकडून काही कमी जास्त गोष्टी घडत असतात, मात्र संघटना व शिस्तच महत्वाची मानली पाहिजे असे त्यांनी सांगितले.मंत्री झाल्यानंतर थोरात दोन वेळा पुण्यात कार्यक्रमांसाठी म्हणून आले होते, मात्र त्यांनी काँग्रेसभवनमध्ये जाणे टाळले. त्याविषयी पदाधिकारी, कार्यकर्त्यामध्ये चर्चा होती. शुक्रवारी पुण्यात आले असताना काँग्रेस भवनला भेट देऊन थोरात यांनी या चर्चेला पुर्णविराम दिला. शहरातील काही जाहीर कार्यक्रमांनंतर थोरात सायंकाळी काँग्रेस भवनला आले. पक्षाच्या आजी माजी लोकप्रतिनिधींसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही यावेळी गर्दी केली होती.थोरात यांनी माध्यमप्रतिनिधीं बरोबर संवाद साधल्यानंतर या पदाधिकाऱ्यांना वेळ दिला. काँग्रेसचा विचार देशाला तारणारा विचार आहे. तोच शाश्वत आहे. त्यामुळे लहानसहान गोष्टींवरून नाराज होणे योग्य नाही. पक्षासाठी पुर्ण वेळ द्या, पक्ष वाढला की काम करणारेही वाढतात असे त्यांनी सांगितले. शहर संघटनेत काही बदल करावेत अशा मागणीवर त्यांनी काहीही भाष्य केले नाही. पक्षाच्या ब्लाॉक अध्यक्षांबरोबर त्यांनी चर्चा केली. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांनाही त्यांनी फक्त तक्रारी करू नका, सुचनाही करत जा, त्यांची पक्षस्तरावर नक्की दखल घेऊ असे आश्वासन दिले.दरम्यान थोरात यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला महिला आघाडी तसेच पक्षाच्या अन्य काही आघाड्यांचे प्रमुख व संघटनेतील काही महत्वाचे पदाधिकारी उपस्थित नव्हते. त्यांच्यापैकी काही जणांकडून त्याची माहितीच आम्हाला दिली गेली नाही अशी तक्रार करण्यात येत आहे. शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी त्याचा इन्कार केला. सर्वांना व्यवस्थित माहिती दिली होती, पक्षाच्या कार्यक्रमाला स्वत: होऊन येणे अपेक्षित असते असे बागवे म्हणाले.मोहन जोशी, माजी आमदार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य : थोरात काँग्रेस भवनला आले नाही या टिकेत काही तथ्य नाही. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर ते आतापर्यंत चार वेळा काँग्रेस भवनला आले आहेत. पक्षाचे शहरातील सर्व आजीमाजी लोकप्रतिनिधी कार्यक्रमाला उपस्थित होते.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसPoliticsराजकारण