शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेब ठाकरेंच्या स्वप्नातील महाराष्ट्र साकार होण्यासाठी सर्वांना ताकद दे- आ. डॉ. नीलम गोऱ्हे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 18:40 IST

“महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् व्हावा, जनतेला कोणताही त्रास होऊ नये, राज्यातील शेतकरी आत्महत्या थांबाव्यात, महिला–मुली व सामान्य नागरिक यांना सुरक्षितता मिळावी याकरिता श्रीगणेशाच्या चरणी प्रार्थना केली आहे.

पुणे, दि. 5 - “महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् व्हावा, जनतेला कोणताही त्रास होऊ नये, राज्यातील शेतकरी आत्महत्या थांबाव्यात, महिला–मुली व सामान्य नागरिक यांना सुरक्षितता मिळावी याकरिता श्रीगणेशाच्या चरणी प्रार्थना केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वतीने राज्यातील सर्व गणेशभक्तांना त्यांची सर्व सुखस्वप्ने साकार होवोत अशा शुभेच्छा दिल्या. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र साकार होण्यासाठी सर्वाना ताकद मिळावी,” अशी प्रार्थना आज शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी श्रींच्या चरणी केली. त्या आज अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या.पुण्याचे ग्रामदैवत श्रीकसबा गणपतीला आज विसर्जन मिरवणुकीत शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण केला व श्रींचे दर्शन घेतले. श्रीगणेशाला वंदन करून त्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाल्या. यावेळी त्यांनी पुणे शहराचे पोलीस सहआयुक्त डॉ. बसवराज तेली, उपायुक्त रवींद्र सेनगावकर यांच्याशी अनौपचारिक चर्चा केली. आ. डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते आज तुळशीबाग परिसरातील गजानन मित्रमंडळाच्या गणपतीची आरती केली. या वेळच्या मिरवणुकीत पुण्यातील छोटा गणेशभक्त ऋतुराज कालेकर बाहुबलीच्या रूपात आज शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासोबत सहभागी झाला. पारंपरिक वेशभूषा करून मिरवणुकीत सहभागी झालेल्या महिलावर्गालाही शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शुभेच्छा दिल्या.विधान परिषदेतील व काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अनंत गाडगीळ यांना आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त ताईनी शुभेच्छा दिल्या. यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री  गिरीष बापट उपस्थित होते. विसर्जन मिरवणुकीच्या वेळी समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, माजी खासदार सुरेश कलमाडी, आमदार माधुरी मिसाळ, आमदार शरद रणपिसे, उल्हासदादा पवार, पुण्याच्या  महापौर मुक्ता टिळक, माजी महापौर अंकुश काकडे, विश्वजीत कदम, सतीश देसाई, वीरेंद्र किराड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासोबत शिवसेनेच्या वतीने मा. उपशहर प्रमुख राजेंद्र शिंदे, नगरसेविका पल्लवी जावळे, राजू विटकर, युवराज शिंगाडे, एकनाथ ढोले, शादाब मुलाणी, स्त्री आधार केंद्राचे शेलार गुरुजी, योगेश शेलार, गणेश मंडळाचे अध्यक्ष सागर दुधभाते व मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते.