शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची बागवे, बहिरट यांना उमेदवारी जाहीर; १४ उमेदवारांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 23:12 IST

पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघापैकी कॉग्रेसकडे कसबा, शिवाजीनगर आणि  पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचा समावेश आहे. कॉग्रेसने यापुर्वी कसबामधुन रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केले आहे.

पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने पुणे कॅन्टोन्मेंटमधुन रमेश बागवे यांना तर शिवाजीनगरमधून दत्ता बहिरट यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.  त्यामुळे पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये भाजपचे आमदार सुनिल कांबळे यांच्या विरूध्द रमेश बागवे, तर शिवाजीनगरमध्ये भाजपचे आमदार सिध्दार्थ शिरोळे आणि  दत्ता बहिरट यांच्यात लढत होणार आहे.   पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघापैकी कॉग्रेसकडे कसबा, शिवाजीनगर आणि  पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचा समावेश आहे. कॉग्रेसने यापुर्वी कसबामधुन रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केले आहे.  विधानसभा निवडणुकीसाठी कॉग्रेसने उमेदवारची चौथी यादी जाहीर केली. त्यात 14 उमेदवारांचा समावेश आहे.

 पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये कॉग्रेसने रमेश बागवे यांना तर शिवाजीनगरमधुन दत्ता बहिरट यांना उमेदवारी दिली आहे.  त्यामुळे या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी विरूध्द महायुती अशी दुरंगी लढत होणार आहे. 

बाहेरच्या व्यक्तीला दिली नाही उमेदवारी 

शिवाजीनगर मतदार संघामध्ये बाहेरच्या व्यक्तीला उमेदवारी देऊ नका . आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्या. अशी भूमिका पक्षातील इच्छुकांनी घेतली होती. शिवाजीनगरच्या उमेदवारीवरून काँग्रेस भवनांमध्ये शनिवारी वादही झाले होते या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसने शिवाजीनगर मध्ये दत्ता बहिरट यांना उमेदवारी जाहीर केली आहे 

आठ विधानसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट 

 शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातील पुणे कॅन्टोन्मेंट ,शिवाजीनगरमध्ये  कॉग्रेसचे उमेदवार जाहीर होणे बाकी होते. पण या दोन मतदारसंघातील उमेदवार जाहीर झाल्यामुळे आठही विधानसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाले आहे. काँग्रेसने दिले जूनेच चेहरे 

 गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉग्रेसेने पुणे कॅन्टोन्मेंट ,शिवाजीनगर, आणि कसबा पोटनिवडणुकीत अनुक्रमे रमेश बागवे, दत्ता बहिरट, रविंद्र धंगेकर  उमेदवार होते. याच उमेदवारांवर विश्वास दाखवत कॉग्रेसने या विधानसभा निवडणुकीत याच जुन्या चेह०यांना संधी दिली आहे.