शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

महत्त्वाची बातमी! खराब खाद्यपदार्थ, हॉटेल, स्वीट होम्सची तक्रार दाखल करता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 13:41 IST

फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाने फूड बिजनेस ऑपरेटर्ससाठी लागू केलेल्या नियमानुसार बिलामध्ये ‘एफएसएसएआय’ लायसन्स नंबर किंवा नोंदणी क्रमांक टाकणं अनिवार्य केल आहे

बारामती: अनेकदा तुम्ही हॉटेलमध्ये जाता मात्र, तेथे भरभक्कम पैसे देऊनही चांगलं जेवण मिळत नाही. त्यामुळे पैसे तर जातातच, पण जेवणही खराब दिलं जातं. मात्र, आता असं करण हॉटेल्सला महागात पडू शकणार आहे. १ ऑक्टोबर, २०२१ पासून खराब खाद्यपदार्थ देणाऱ्या हॉटेल, केटरर्स, स्वीट होम्स, बेकरी यांची तात्काळ तक्रार दाखल करण्याचे अधिकार ग्राहकांना देण्यात आले आहे. अन्न सुरक्षा विभागाने याबाबत आदेश जारी केले आहेत. याबाबत राष्ट्रीय ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य अ‍ॅड. तुषार झेंडे यांनी माहिती दिली. त्यानुसार फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाने (fssai) फूड बिजनेस ऑपरेटर्ससाठी १ ऑक्टोबरपासून एक नवा नियम लागू केला आहे. आजपासूनच त्याची अंमलबजावणी देखील सुरु झाली आहे.

फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाने (Food Safety and Standards Authority of India) फूड बिजनेस ऑपरेटर्ससाठी लागू केलेल्या नियमानुसार बिलामध्ये ‘एफएसएसएआय’ लायसन्स नंबर किंवा नोंदणी क्रमांक टाकणं अनिवार्य केल आहे. याबाबत ‘एफएसएसएआय ’ने एक आदेश जारी केला आहे. यामुळे आता जेवणाच्या गुणवत्तेबाबत, इतर तक्रारींविषयी ग्राहकांना तक्रार करणं सोपं होणार आहे. यापुढे ग्राहक ‘एफएसएसएआय’ नंबरचा उपयोग करुन संबंधित हॉटेलविरोधात ऑनलाईन तक्रार नोंदवू शकतात.

अन्न सुरक्षा विभागाने दिलेल्या आदेशानुसार प्रत्येक फुड बिजनेस ऑपरेटरला आपला व्यवसाय सुरू करण्यापूर्वी ‘एफएसएसएआय’ किंवा नोंदणी मिळवणं आवश्यक आहे. खाद्यपदार्थ उद्योग मोठा आहे. या व्यवसायांचा ‘एफएसएसएआय’क्रमांक ग्राहकांना सहजासहजी दिसत नाही. कोणतीही विश्वासार्ह नियंत्रण व्यवस्था ही त्यामधील ग्राहकांच्या मजबूत ग्राहक तक्रार प्रणालीवर अवलंबून आहे. जर संबंधित हॉटेल किंवा रेस्टॉरंटकडे एफएसएसएआय नंबर नसल्यास, त्यांच्या विरोधात तक्रार करणं कठिण काम होऊन जातं.

दरम्यान, खाद्यपदार्थ विभागाच्या अधिकाऱ्यांना नव्या नियमांच्या प्रचारासाठी निर्देश जनजागृती आणि प्रबोधन करण्याचंही नियोजन केल आहे. यासाठी त्यांनी परवाना आणि नोंदणी अधिकाऱ्यांना नव्या नियमांचा प्रचार करण्याचे निर्देश दिले आहेत. हे नियम २ ऑक्टोबर २०२१ पासून लागू होतील. पॅकेजिंग केलेल्या अन्नपदार्थांवर ‘एफएसएसएआय नंबर छापणं बंधनकारक करण्यात आल आहे. यात रेस्टॉरंट्स, मिठाईची दुकानं, केटरर्स आणि किरकोळ विक्री करणाऱ्यांचाही समावेश आहे. यांनाही आपल्या खाद्य पदार्थांवर हा नंबर नमूद करावा लागणार आहे.

... ‘एफएसएसएआय’ नंबरचं ग्राहकांसाठी महत्त्व-  ‘एफएसएसएआय’ क्रमांक हा कोणत्याही खाद्यपदार्थ उत्पादकाचा खास १४ अंकी क्रमांक असतो. ‘एफएसएसएआय’ क्रमांक संबंधित उत्पादकाच्या खाद्यपदार्थ पॅकिंगवर नमूद असल्यास त्यांच्या विरोधात सहज तक्रार करता येते. मात्र, जर तो क्रमांक नसल्यास संबंधित पदार्थ कुणाचे आहेत, याची ओळख पटवणं कठीण होतं. म्हणूनच फूड बिजनेस ऑपरेटरची तक्रार करण्यासाठी हा क्रमांक खूप महत्त्वाचा आहे. त्यातून दोषींवर तात्काळ कारवाई करता येणार असल्याचे अ‍ॅड झेंडे यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेfoodअन्नFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागfood poisoningअन्नातून विषबाधाhotelहॉटेल