शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा नियोजन निधी कपातीचा निर्णय मागे -सुधीर मुनगंटीवार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 01:56 IST

शेतकरी कर्जमाफी आणि वित्तीय तूट विचारात घेऊन प्रत्येक जिल्हा नियोजन समितीसाठी दिलेल्या एकूण निधीमध्ये ३० टक्के निधीची कपात करण्याचा निर्णय राज्य शासनातर्फे घेण्यात आला होता. मात्र, हा निर्णय मागे घेण्यात आला असून लवकरच त्याचा अध्यादेश काढला जाईल, असे राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार पुण्यात जाहीर केले.

पुणे - शेतकरी कर्जमाफी आणि वित्तीय तूट विचारात घेऊन प्रत्येक जिल्हा नियोजन समितीसाठी दिलेल्या एकूण निधीमध्ये ३० टक्के निधीची कपात करण्याचा निर्णय राज्य शासनातर्फे घेण्यात आला होता. मात्र, हा निर्णय मागे घेण्यात आला असून लवकरच त्याचा अध्यादेश काढला जाईल, असे राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार पुण्यात जाहीर केले.राज्याच्या नियोजन विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय प्रारूप आराखाडा बैठक मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात विधान भवन येथे घेण्यात आली. या बैठकीस अर्थराज्य मंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्र्रकांत पाटील,सहकार मंत्री सुभाष देशमुख, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, दुग्ध विकास व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर,खासदार संजय काकडे, पुणे विभागीय आयुक्त चंद्र्रकांत दळवी यांच्यासह विभागातील जिल्हाधिकारी उपस्थित होते.शेतकरी कर्जमाफीसाठी निधीची आवश्यकता असल्याने शासनाने प्रत्येक जिल्ह्या दिलेल्या विकास निधीमध्ये ३० टक्के कपात केली होती. त्याचप्रमाणे केंद्राच्या विविध योजनांसाठी जिल्हा प्रशासनाला काही टक्के निधी राखून ठेवावा लागत होता. त्यामुळे एकूण प्राप्त निधीपैकी केवळ ५० टक्के निधीच खर्चासाठी उपलब्ध होत होता.याबद्दल सर्वच जिल्हाधिकाºयांनी व उपस्थित लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली. त्यावर ३० टक्के कपातीचा निर्णय मागे घेतला जात असल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पुढील दोन महिन्यांत सर्व जिल्ह्यांना त्यांना देण्यात आलेला १०० टक्के निधी वापरणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे केंद्राच्या योजनांसाठी राखून ठेवल्या जाणा-या निधीच्या टक्केवारीमध्ये सुद्धा कपात करण्याच्या सूचना दिल्या जातील, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार