शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

‘बाप माणसां’ची लावताहेत वाट : शरद पोंक्षे : ‘बाप माणूस’चे पुण्यात प्रकाशन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 12:25 IST

विध्वंसक संघटनांकडून इतिहासातल्या ‘बाप माणसां’ची वाट लावण्यात येत आहे, असे मत अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले. मंजूषा आमडेकर लिखित ‘बाप माणूस’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी पोंक्षे बोलत होते.

ठळक मुद्देहे पुस्तक माझे वडील बाळकृष्ण जोशी यांच्यावर आधारित : मंजूषा आमडेकरपार्श्वभूमी माहिती नसताना दंगलसदृश परिस्थिती निर्माण करणे निंदनीय : शरद पोंक्षे

पुणे : इतिहासाचा शून्य अभ्यास असणारे लोक सध्या छातीठोकपणे इतिहास सांगत आहे. यातून चुकीचा इतिहास निर्माण केला जात आहे. अशा चुकीच्या इतिहासाला साक्ष मानत देशात सर्वच बाप माणसांच्या म्हणजेच महापुरुषांच्या नावाने गलिच्छ राजकारण सुरू आहे. कोरेगाव भीमा इथे जे काही घडले त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. समाजातील विध्वंसक संघटनांकडून इतिहासातल्या ‘बाप माणसां’ची वाट लावण्यात येत आहे, असे मत अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले. मंजूषा आमडेकर लिखित ‘बाप माणूस’ या पुस्तकाचे प्रकाशन कर्वे रस्त्यावरील स्वामिकृपा हॉल येथे करण्यात आले. त्या वेळी पोंक्षे बोलत होते. या कार्यक्रमाला नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, ज्ञानप्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीश बापट, बाळकृष्ण जोशी, उद्योजक मंदार केळकर, आनंद कृष्णाजी कोंडकर, मंजूल प्रकाशन हाऊसचे चेतन कोळी आदी उपस्थित होते. याच कार्यक्रमात आमडेकर लिखित व अनुवादित अनुक्रमे मन्नो व हॅरी पॉटरच्या काही भागांचे प्रकाशन करण्यात आले. मंजूषा आमडेकर म्हणाल्या, हे पुस्तक माझे वडील बाळकृष्ण जोशी यांच्यावर आधारित आहे. आयुष्यात संघर्ष प्रत्येकजण करत असतो. परंतु यांचे जीवन म्हणजे एक अभिनव प्रयोगशाळा आहे. त्यांनी या प्रयोगांद्वारे संकटावर मात केली.’   पोंक्षे म्हणाले, कोरेगाव भीमा इथे जे काही घडले ते अत्यंत वाईट व दुर्दैवी आहे. परंतु, तिथे घडलेल्या इतिहास व संघर्षाची कोणतीही पार्श्वभूमी माहिती नसताना दंगलसदृश परिस्थिती निर्माण करणे निंदनीय व समाजाच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे. असा इतिहास लिहिणाºया व सांगणाऱ्या लोकांना सत्य इतिहासाचे लेखन करत प्रत्युत्तर दिले पाहिजे. 

टॅग्स :Puneपुणे