शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अस्ताव्यस्त सायकलींचा पादचारी नागरिकांना त्रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 03:02 IST

सायकल स्टॅण्ड नसल्याने चांगल्या योजनेला लागले ग्रहण

पाषाण : स्मार्ट सिटी एरियामध्ये सायकल शेअरिंग उपक्रम सुरू करण्यात आला आहे परंतु सर्वत्र सायकली अस्ताव्यस्त अवस्थेत असल्याने या सायकलींचा पादचारी नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. नागरिकांनी सायकली वापराव्यात म्हणून बाणेर बालेवाडी परिसरातील चौकांमध्ये सायकली ठेवण्यात येतात .या सायकली वापरानंतर या सायकली ठेवायचा कुठे हा प्रश्न असल्याने रस्त्यावरच सायकली सोडण्यात येतात . अनेकदा रस्त्याच्या मध्यभागी फूटपाथच्या मध्यभागी या सायकली उभ्या करण्यात येत असल्याने याचा वाहतुकीलादेखील अडथळा निर्माण होतो.सायकली देण्यात आल्या पण सायकली ठेवण्यासाठी स्टँड उपलब्ध नाही यामुळे अनेक समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. तर अनेकदा फूटपाथवर पडलेल्या सायकली उचलल्या जात नाहीत तसेच आडबाजूच्या रस्त्यांवरील सायकली बराच काळ तशाच असतात यामुळे आवश्यक ठिकाणी सायकलींचा वापर होतोच असे चित्र पाहायला मिळत नाही.सुट्या भागांची होते चोरीअनेक ठिकाणी सायकलींचे स्पेअर पार्ट चोरीला गेलेले पाहायला मिळतात तर काही ठिकाणी कचऱ्याच्यामध्ये अनेक सायकली पाहायला मिळतात.बाणेर बालेवाडी परिसरामध्ये सायकली वापरानंतर त्या सायकली योग्य जागी ठेवण्यासाठी स्टँड उपलब्ध करून देण्यात यावे तसेच सायकलींचे मार्ग उपलब्ध करण्यात यावेत अशी मागणी नागरिक करीत आहेत .

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीPuneपुणे