शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

ढोल पथकामुळे गणेशोत्सवाला मांगल्याचे स्वरूप : मुरलीधर मोहोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 11:54 IST

सामाजिक भावनेतून विविध उपक्रमात सहभागी होऊन समाजकार्यात भाग घ्यावा’, असे प्रतिपादन पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी केले. ‘स्वराज्य सन्मान पुरस्कार’ सोहळ्यात मोहोळ बोलत होते.

ठळक मुद्देस्वराज्य ढोल पथकाच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त ‘स्वराज्य सन्मान पुरस्कार’ सोहळाजगातील सर्व शिखरांवर शिवाजी महाराजांना घेऊन जायचे आहे : - अनिल वाघ

पुणे : ‘गणेशोत्सवात पाश्चिमात्य संगीताच्या नादावर, डीजेवर थिरकणारी तरुणाई आपण गेल्या काही वर्षांपूर्वी पाहत होतो. मात्र, ढोलताशा पथकांनी पारंपरिक वाद्यांतून गणेशोत्सवाला मांगल्याचे स्वरूप दिले आहे. ढोलताशा पथकांनी केवळ गणेशोत्सवापुरते मर्यादित राहू नये. सामाजिक भावनेतून विविध उपक्रमात सहभागी होऊन समाजकार्यात भाग घ्यावा’, असे प्रतिपादन पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी केले.स्वराज्य ढोल पथकाच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘स्वराज्य सन्मान पुरस्कार’ सोहळ्यात मुरलीधर मोहोळ बोलत होते. याप्रसंगी शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष महेश लडकत, नगरसेविका हर्षाली माथवड, वासंती जाधव, ढोल ताशा महासंघाचे शिरीष थिटे, पथकाचे अध्यक्ष प्रसाद चिपाडे, मंदार राजवाडे, पराग काटे, रवी रोकडे, प्रेम क्षीरसागर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात जव्हार मोखाडा आदिवासी भागात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ग्रामभारती समाज परिवर्तन संस्थेचे डॉ. पुरुषोत्तम आगाशे, आफ्रिका येथे ९ शिखरांवर सायकलस्वारी करून किलीमांजरो येथे शिवजयंती साजरी करण्यासाठी जाणा-या अनिल वाघ यांना ‘स्वराज्य सन्मान पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी ग्रामभारती संस्थेला संगणक भेट देण्यात आला. महेश लडकत म्हणाले, ‘ढोल पथकांच्या माध्यमातून चांगले सामाजिक कार्य उभा राहू शकते, हे स्वराज्य ढोल पथकाने दाखवून दिले आहे. या पथकाच्या स्थापनेपासूनच प्रवास मी पाहत आहे. ही तरुणमंडळी सुसंस्कृत आहेत. गणेशाची सेवा करण्याबरोबरच समाजाची सेवा करण्याची यांची भावना अतिशय प्रेरक आहे.’शिरीष थिटे यांनीही मनोगत व्यक्त केले. भाग्यश्री देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रसाद चिपाडे यांनी आभार मानले.  

आदिवासी भागात कुपोषण, आरोग्याचा प्रश्न मोठा आहे. त्यांच्या पदरी दारिद्र्य, गरिबी आणि बिकट जीवन आलेले आहे. त्यांच्या आयुष्यात थोडाफार बदल व्हावा, यासाठी गेली १८ वर्षे काम करीत आहे. तिथल्या मुलांना चांगले शिक्षण व इतर सोयी पुरविण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण युवकांनी ग्रामीण भागातील, आदिवासी पाड्यांतील लोकांचे जीवन सुधारण्यासाठी पुढाकार घ्यावा. - डॉ. पुरुषोत्तम आगाशे 

जगातील सर्व शिखरांवर शिवाजी महाराजांना घेऊन जायचे आहे. शिवप्रेमींनी या मोहिमेसाठी सहकार्य करावे. गिर्यारोहकांना प्रोत्साहित करण्यासाठी पालिकेने पुढाकार घ्यावा.’- अनिल वाघ 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजPuneपुणे