शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे प्रचारावर लक्ष

By admin | Updated: February 12, 2017 04:53 IST

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी अनेक सोसायट्यांना मोफत सीसीटीव्ही कॅमेरे बसवून दिले आहेत. मात्र, या सीसीटीव्हीचे कंट्रोल त्यांनी स्वत:कडे ठेवले आहे.

पुणे : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी अनेक सोसायट्यांना मोफत सीसीटीव्ही कॅमेरे बसवून दिले आहेत. मात्र, या सीसीटीव्हीचे कंट्रोल त्यांनी स्वत:कडे ठेवले आहे. त्यातील फुटेजची दररोज पडताळणी करून महापालिका निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाचे उमेदवार, कार्यकर्ते सोसायट्यांमध्ये कोणाला भेटत आहेत, कसा प्रचार करीत आहेत, यावर त्यांच्याकडून बारीक लक्ष ठेवले जात आहे. उमेदवारांच्या कुरघोड्यांमुळे निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे.शहराच्या विविध भागांमध्ये हजारो लहान-मोठ्या सोसायट्या आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या बैठका इच्छुक उमेदवारांकडून घेतल्या जातात. उमेदवाराकडून स्व:खर्चातून सोसायट्यांच्या इमारतींना रंग देऊ, दिवे बसवू, फरशी टाकून देऊ, अशी आश्वासने दिली जायची, त्यामध्ये आता सीसीटीव्ही बसवून देण्याचे मोठे फॅड निघाले आहे.सोसायट्यांच्या संरक्षणासाठी पोलिसांनी सर्व सोसायट्यांना सीसीटीव्ही बसविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे उमेदवारांकडून सोसायटीमध्ये मोफत सीसीटीव्ही बसवून देण्याची आॅफर दिली जात आहे. अनेक सोसायट्यांनीही ही आॅफर स्वीकारून सोसायट्यांच्या प्रवेशद्वारात, तसेच आतील भागात सीसीटीव्ही बसवून घेतले आहेत. उमेदवारांनी हे सीसीटीव्ही बसविताना त्याचे कंट्रोल स्वत:कडे ठेवले आहे. निवडणुकीच्या काळात या सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करण्यासाठी उमेदवारांनी विशेष यंत्रणा कार्यान्वित केली आहे. त्यानुसार दररोजच्या दररोज सोसायट्यांमध्ये विरोधी पक्षाचे उमेदवार, कार्यकर्ते कोणाला भेटत आहेत यावर त्यांच्याकडून बारीक लक्ष ठेवले जात आहे. मोफतचा मारा करून सोसायट्यांची मते विकत घेतलेल्या उमेदवारांनी सीसीटीव्हीच्या मदतीने सोसायट्यांवर लक्ष ठेवण्याचा फंडा अवलंबला आहे. काहीही करून निवडणूक जिंकायची, या हेतून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या कोट्यधीश उमेदवारांकडून हा फंडा वापरला जात आहे. धनकवडी, कात्रज, कोथरूड, औंध, हडपसर, कल्याणी नगर, बाणेर आदी भागांमध्ये थोड्या बहुत फरकाने हे प्रकार सुरू आहेत. मोफत सीसीटीव्ही मिळविण्याच्या नादात सोसायट्यांची सुरक्षा व्यवस्था खासगी व्यक्तीच्या ताब्यात जात आहे. इच्छुक उमेदवारांनी सोसायटीची विविध कामांचा खर्च द्यावा, यासाठी काही सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून दबाव टाकला जात असल्याचे एका इच्छुक उमेदवारांनी सांगितले. तुम्ही हा खर्च दिला नाही, तर तुम्हाला आमच्या सोसायटीतील एकही मत मिळणार नाही, असे सांगून उमेदवारांवर दबाव टाकला जातो. त्यामुळे काही इच्छुकांना इच्छा नसतानाही सोसायट्यांच्या खर्चाचा भार उचलावा लागत आहे. (प्रतिनिधी)त्यांच्यापेक्षाही वाईट तऱ्हावस्त्या, झोपडपट्ट्यांमध्ये राहणारा मतदार पैसे घेतल्याशिवाय मतदानाला बाहेर पडत नाही, असं सर्रास बोलले जाते. मात्र, सोसायट्यांमधील शिक्षित मतदारांकडून, तर दबावतंत्राचा वापर करून उच्चभ्रू लूट केली जात असल्याचे स्पष्ट होत आहे.महापालिकेच्या खर्चातूनही सोसायट्यांची कामेअनेक इच्छुक उमेदवार त्यांच्या खर्चातून सोसायट्यांची कामे करतातच. मात्र, काही विद्यमान नगरसेवकांनी महापालिकेच्या निधीमधून सोसायट्यांची कामे करून दिली आहे. खासगी जागांवर पालिकेचा पैसा खर्च करता येत नसतानाही सर्रास पालिकेचा निधी सोसायट्यांमध्ये वापरला गेला आहे.