शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
5
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
6
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
7
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
8
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
9
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
10
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
11
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
12
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
13
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
14
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
15
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
16
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
18
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
19
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
20
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला

फरार असताना मालमत्ता विकण्याचा मोतेवारांचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 00:11 IST

ठेवीदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील समृद्ध जीवनचे सर्वेसर्वा महेश मोतेवार यांच्या पत्नी वैशाली मोतेवार यांनी फरार असताना विविध मालमत्ता विकण्याचा प्रयत्न केल्याचे पुढे आहे.

पुणे : ठेवीदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील समृद्ध जीवनचे सर्वेसर्वा महेश मोतेवार यांच्या पत्नी वैशाली मोतेवार यांनी फरार असताना विविध मालमत्ता विकण्याचा प्रयत्न केल्याचे पुढे आहे. तपासासाठी त्यांना विशेष न्यायालयाने ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.वैशाली मोतेवार यांना न्यायालयाने २०१६ मध्ये फरारही घोषित केले होते. राज्य गुन्हे अन्वेषणच्या (सीआयडी) पथकाने त्यांना शनिवारी अटक केली. रविवारी त्यांना न्यायालयात हजर केले होते. वैशाली या समृद्ध जीवन फुड्स इं. लि. या कंपनीच्या आॅक्टोबर २००९ पासून संचालक होत्या. २०१३ मध्ये कंपनीच्या त्या दुसऱ्या क्रमांकाच्या शेअरधारक आहेत. त्यांच्या नावावर १७ हजार शेअर्स असून हा वाटा एकूण १७.८९ टक्के आहे. कंपनीने ३ हजार ५०० कोटींहून अधिक रकमेची फसवणूक केली आहे. संचालक म्हणून कार्यरत असल्यामुळे अपहार केलेल्या पैशांबाबत वैशाली यांच्याकडे तपास करायचा आहे. फरार कालावधीत त्यांनी मालमत्ता विक्रीचाही प्रयत्न केला आहे. महेश मोतेवार यांनी मुलगा अभिषेक याला पॉवर आॅफ अ‍ॅटर्नीचे अधिकार दिले असून आतापर्यंत किती मालमत्तांची विल्हेवाट लावली याचा तपास करायचा आहे. वैशाली यांच्यावर ८ राज्यांमध्ये २६ गुन्हे दाखल आहेत. तपास करण्यासाठी अतिरिक्त सरकारी वकील सुनील हांडे यांनी १४ दिवस पोलीस कोठडीची मागणी केली.१२ कंपन्यांमध्ये वळवला पैसाप्रजा विचार मास मीडिया लि., समृद्ध जीवन ट्रेडिंग अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरिंग, जीवन ज्योती कन्स्ट्रक्शन्स, न्यूट्रीलॉन मिल्क अ‍ॅण्ड मिल्क प्रा. लि., आॅर्चिड रिसोर्ट प्रा. लि., सुवर्णा मुद्रा अ‍ॅण्ड हॉटेल्स, स्ट्रान्स हॉटेल्स अ‍ॅण्ड हॉस्पिलिटी, सुवर्णमुद्रा हॉस्पिलिटी, समृद्ध जीवन फिनविस्ट लि., टेकमाइंड इन्फोटेक प्रा. लि., टॅक्ससाईट टेलेटेक प्रा. लि. आणि अलेगन्स इंटरटेनमेंट प्रा. लि. अशा १२ कंपन्यांमध्ये वैशाली मोतेवार संचालक होत्या. या सर्व कंपन्यांना समृद्ध जीवनमधून पैसा वळता करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.पगारापोटी १ कोटी १० लाख दिले : कंपनीच्या मिळालेल्या अहवालानुसार वैशाली यांना पगार स्वरूपात १ कोटी १० लाख रुपये देण्यात आले आहेत. तसेच १७ कोटी ८८ लाखांची अतिरिक्त रक्कमही देण्यात आल्याचे उघड झाले आहे.

टॅग्स :Puneपुणे