शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा पदाधिकाऱ्याच्या खुनाचा प्रयत्न, कारण गुलदस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 01:10 IST

भोरमध्ये येत असताना तीन ते चार जणांनी कार आडवी लावून गाडीच्या काचा फोडून चाकूने वार करुन कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष रितेश वैद्य (वय ४०) यांच्या खुनाचा प्रयत्न केला.

पुणे /भोर  - भोरमध्ये येत असताना तीन ते चार जणांनी कार आडवी लावून गाडीच्या काचा फोडून चाकूने वार करुन कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष रितेश वैद्य (वय ४०) यांच्या खुनाचा प्रयत्न केला़ ही घटना भोर -महाड रोडवरील निगुडघर दरम्यान शनिवारी रात्री साडेआठ वाजता घडली़ या घटनेत रितेश वैद्य गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खेड शिवापूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु करण्यात येत आहे़ याप्रकरणी तेजस प्रदीप कुलकर्णी यांनी फिर्याद दिली आहे़पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रितेश आनंद वैद्य, रमेश परमार, उदय कड हे तेजस कुलकर्णी यांच्या गाडीतून शनिवारी फलटण येथील मित्राच्या भावाच्या लग्नाला गेले होते़ तेथून ते सासवडला आले. त्या ठिकाणी उदय कड यांच्या शेटटी नावाच्या मित्रास भेटले. ़ शेटटी व त्यांचे मित्र असे चार जण एका गाडीत व तेजस कुलकर्णी यांच्या गाडीत चार एका गाडीने नारायणपुरवरुन भोरला आणि इथुन निगुडघरला सायंकाळी ७ वाजता पोहचले. जेवण झाल्यावर शेटटी तिथेच थांबले तर एक गाडी भोर बाजुकडे निघाली महाड-भोररोडवरुन निगुडघरच्या पुढे आल्यावर वाटेत ते लघुशंकेसाठी थांबले़ त्यावेळी रितेश वैद्य गाडी चालवत होते़ सर्व जण पुन्हा गाडीत बसल्यावर मागुन आलेल्या दुसºया गाडीने त्यांच्या गाडीला आडवी लावुन थांबायला भाग पाडले़ त्या गाडीतून ३ ते ४ जणांनी खाली उतरून दांडक्याने गाडीच्या काचा फोडल्या़ रितेश वैद्य याच्या छातीवर पोटात धारधार शस्त्राने वार केले़ वैद्य यांना खेड शिवापूर येथील खासगी दवाखान्यात दाखल केले असुन त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. दरम्यान या घटनेची महिती रविवारी सकाळी मिळाल्यावर पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांनी घटना स्थळाला भेट देऊन महिती घेतली़ यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक डॉ़ संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव पोलीस निरीक्षक पांडुरंग सुतार, पोलीस निरीक्षक घोडसे हे उपस्थित होते़ आमदार मेधा कुलकर्णी यांनी भोर पोलीस ठाण्याला भेट दिली.रतेश वैद्य कोथरुड विधानसभा मतदार संघाचे भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष असून तेजस कुलकर्णी पुणे शहर भाजपा युवा मोर्चाचे संपर्क प्रमुख तर उदय कड पुणे जिल्हा हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष आहेत. सर्व जण मित्र असुन एकत्र लग्नाला गेले़ तिथुन ते जेवायला भोरला आले होते़ 

टॅग्स :Crimeगुन्हाBJPभाजपा