शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: तेजस्वी यादव काँग्रेससोबतच्या बैठकीतून निघून आले; राहुल गांधी, खर्गेंना न भेटताच बिहारला पोहोचले...
2
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘मोदी चांगले मित्र आहेत’; बाजूलाच उभे असलेले पाकिस्तानचे शाहबाज शरीफ अवाक, व्हिडीओ व्हायरल
3
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टीमध्ये ७० अंकांची तेजी; IT आणि मेटल शेअर्स सुस्साट
4
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
5
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; दीड वर्षांपूर्वी पळून जाऊन लग्न, लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
6
१ नोव्हेंबरपासून करू शकणार २३९० रुपयांत हवाई प्रवास, या दिग्गज कंपनीनं केली मोठी घोषणा
7
आधी क्रूरपणे अत्याचार, नंतर ५ हजारांची ऑफर; पीडितेचे वडील म्हणाले, "बंगालमध्ये औरंगजेबाचं शासन"
8
राष्ट्रीय महामार्गावरील अस्वच्छ शौचालयाचा फोटो पाठवा, Fastag मध्ये ₹१००० रुपये मिळवा; काय आहे हा प्रकार?
9
५०० वर्षांनी हंस केंद्र त्रिकोण राजयोग: ९ राशींना बोनस, अकल्पनीय लाभ; भाग्योदय-पैसा-भरभराट!
10
लोकल लेट झाल्याने बदलापूर स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी; गर्दी आवरण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल स्थानकात
11
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू
12
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
13
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
14
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
15
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
16
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
17
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
18
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
19
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
20
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी

बारामती येथील गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात ज्येष्ठाचा आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 15:35 IST

घरकुलाच्या कारणास्तव प्राशन केले उंदीर मारण्याचे औषध..

ठळक मुद्देतातडीने वैद्यकीय उपचार मिळाल्याने प्रकृती सध्या स्थिर

बारामती :बारामती शहरात पंचायत समिती कार्यालय आज चर्चेचा विषय ठरले. कार्यालयातील गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात एका ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने घरकुलाच्या ताब्याच्या कारणावरून उंदीर मारण्याचे औषध प्राशनकेले.बुधवारी(दि२०) सायंकाळी हा प्रकार घडला. पंचायत समितीमध्ये या ज्येष्ठाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने शहरात खळबळ उडाली.अशोक फिलोमन दामले असे या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. दामले हे बारामती तालुक्यातील पणदरे येथील राहिवाशी आहेत.  येथील पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात त्यांच्याच समोर उंदिर मारण्याचे विषारी औषध प्राशन केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेनंतर  दामले यांनापंचायत समितीच्या वाहनातून तातडीने येथील सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. सदानंदकाळे व त्यांच्या सहकाऱ्यानी दामले यांच्या पोटातील विष बाहेर काढले.तातडीने वैद्यकीय उपचार मिळाल्याने दामले यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. पणदरे परिसरात गीतानगर परिसरात चाळीमध्ये दामले यांना शासनाकडून घरकुल देण्यात आले होते. ते गावामध्ये राहत नसताना दुसऱ्या व्यक्तीने हे घरकुल बळकावल्याची दामले यांची तक्रार आहे.या विरोधात दामले यांचा पंचायतसमिती,पोलिसांंच्या शासन दरबारी लढा सुरु होता. त्याला यश न आल्याने ते निराश होते.याच नैराश्यातुन  त्यांनी टोकाची भुमिका घेतल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.याबाबत गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी सांगितले की,दामले यांनी हे पाऊल का उचलले हे कळाले नाही. दामले यांचे घरकुल त्यांच्या ताब्यात देखीलदेण्यात आले आहे.उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार यांच्या उपस्थितीतयासंबंधी बैठकही पार पडली आहे.  घरकुल बळकावणा कडून काही त्रास होतअसल्यास तशी लेखी तक्रार द्या, असे उपविभागीय पोलिस अधिका?्यांकडून त्यांना सांगण्यात आले होते. पंचायत समिती, ग्रामपंचायत स्तरावर त्यांचाकोणताही विषय प्रलंबित नव्हता.---------------------

टॅग्स :Baramatiबारामती