शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

विवाहित महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न; लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 16:32 IST

घरात कोणीही नाही याचा फायदा घेत ओळखीच्या विवाहित महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाºयावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे२८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७-१५ वाजण्याच्या सुमारास घडला प्रकार पीडित महिला मूळ कर्नाटक राज्यातील असून तिचे पती सौदी अरेबिया येथे करतात काम

लोणी काळभोर : घरात कोणीही नाही याचा गैरफायदा घेत ओळखीच्या विवाहित महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाºयावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार हा प्रकार २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७-१५ वाजण्याच्या सुमारास घडला असून याप्रकरणी सुधीर सूर्यवंशी (रा. खोरावडा फाटा, सोरतापवाडी, ता. हवेली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला मूळ कर्नाटक राज्यातील असून तिचे पती सौदी अरेबिया येथे काम करतात. सध्या ते घरी आलेले असून गेल्या १० वर्षांपासून सुधीर व त्यांची ओळख आहे. तिच्या लग्नाअगोदर तो तिच्याकडे प्रेमाची याचना करत होता. लग्नानंतरही तो तिला त्रास देत होता. ही बाब तिने पतीस सांगितली होती.२८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घरगुती कामानिमित्त तिचे पती घराबाहेर गेले होते. ती स्वयंपाक करत होती. ७:१५च्या सुमारास सुधीर सूर्यवंशी तेथे आला. त्याने मद्यप्राशन केले होते. आल्यानंतर त्याने तुझा पती पुन्हा सौदी येथे कामास केव्हा जाणार, अशी विचारणा केली. तिने घरात कशाला आलास, असे विचारले असता त्याने शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन तो करू लागला. तिने प्रतिकार करताच तिला मारहाण करून त्याने दाराची कडी लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिने केलेल्या आरडाओरडा यामुळे शेजारी जमा होत आहेत, हे पाहून तो आपल्या दुचाकीवरून पळून गेला.

 

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरRapeबलात्कारPuneपुणे