शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

भांडणे सोडविल्याच्या रागातून डोक्यात कोयता, बिअरची बाटली मारुन खुनाचा प्रयत्न; पुण्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 11:54 IST

चतु:श्रृंगी पोलिसांनी तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल..

ठळक मुद्देगर्व्हमेंट पॉलिटेक्निक ग्राऊंडवरील घटना : तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : भांडणे सोडविल्याच्या रागातून तिघा जणांनी तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन तसेच बिअरची बाटली मारुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

रोहित कुऱ्हाडे, जयेश लोखंडे, साहिल रजपूत अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सचिन यल्लाप्पा बनपट्टे (वय ३४,रा. वडारवाडी) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. सचिन बनपट्टे हे त्यांचा मित्र अनु कांबळे यास भेटण्यासाठी गर्व्हेमेंट पॉलिटेक्निक ग्राऊंडवर रविवारी दुपारी भेटण्यासाठी जात होते. यावेळी सचिन यांच्या ओळखीचे विजय विटकर यांना रोहित कुऱ्हाडे यांनी कानाखाली मारली. त्यावेळी त्यांनी भांडणे सोडविली. सचिन बनपट्टे हे मैदानात बोलत थांबले असताना रोहित व त्याचे मित्र तेथे पुन्हा आले. रोहित याने पाठीमागून येऊन सचिन यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला. तसेच क्रिकेटच्या बॅटने मारुन जखमी केले. तसेच सचिन यांचा मित्र तुषार आलकुंटे यांना बिअरची बाटली मारुन गंभीर जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक भोसले अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस