शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत रिव्हॉल्वर दाखवून जीवे मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 14:44 IST

महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पोटाला रिव्हॉल्व्हर लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी अमोल मुरलीधर घुले (रा़ मार्केटयार्ड) यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़.

पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पोटाला रिव्हॉल्व्हर लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी अमोल मुरलीधर घुले (रा़ मार्केटयार्ड) यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ ही घटना साधु वासवानी चौकातील महाराष्ट्र सहकारी संघाच्या कार्यालयाचे दुसऱ्या मजल्यावरील पॅसेजमध्ये १९ मार्च २०१८ रोजी सकाळी सव्वाअकरा ते बारा वाजण्याच्या दरम्यान घडली होती़ याप्रकरणी नितीन धोंडीराम बनकर (वय ४८, रा़ लक्ष्मी रेसिडेन्सी, भायखळा, मुंबई) यांनी बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडी पुरस्कृत सदस्य आणि भारतीय जनता पक्ष पुरस्कृत उमेदवारांमध्ये जोरदार राडा झाला होता़ त्या भाजप पुरस्कृत सदस्यांनी मतदान पेटी आणि टेबल खुर्च्या भिरकावून दिल्याने एकच गोंधळ झाला होता़ या गोंधळामुळे अध्यक्षपदाची निवडणुक स्थगित करण्यात आली आहे़.     याबाबत पोलिसांनी सांगितले की, राज्य सहकारी संघाचे दुसऱ्या मजल्यावरील पॅसेजमध्ये नितीन बनकर असताना अमोल घुले हे सहकारी संघाचे निवडणुकीचा राग मनात धरुन त्यांचे नेते संजय कुसाळकर, हिरामण सातकर, रामदास मोरे व इतर नेत्यांना तुम्ही त्रास दिला तर गोळ्या घालीन असे म्ळणून त्यांनी त्यांच्या कमरेला लावलेले सिल्व्हर रंगाचे रिव्हॉल्व्हर बाहेर काढून बनकर यांच्या पोटास लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केला़ या घटनेमुळे राज्य सहकारी संघाची निवडणुक स्थगित करण्यात आली आहे़ त्यानंतर बनकर यांनी बंडगार्डन पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता़  घटनास्थळाला सहायक पोलीस आयुक्त जयश्री गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम़ एम़ मुजावर यांनी भेट दिली़ अर्जाची चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ निरीक्षक एम़ एम़ मुजावर अधिक तपास करीत आहेत़

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हा