सागर मनोज विटकर (वय २६, रा. वाजगे आळी) असे आरोपीचे नाव आहे. पोलिस निरीक्षक घनवट यांनी दिलेल्या माहिती नुसार, आंबेगाव आणि जुन्नर परिसरातील रेकॉर्ड वरील गुन्हेगारांचा शोध सुरू होता. यावेळी सागर मनोज विटकर हा नारायणगाव बस स्टॅन्ड येथे संशयितरित्या फिरताना आढळला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याची झडती घेतली असता त्याच्या पॅन्ट च्या खिश्यामध्ये ३ मोबाइल सापडले. त्या बाबत त्याला विचारले असता ते वाजगे आळी येथून चोरल्याचे सांगितले. त्याची अधिक कसून चौकशी केली असता त्याने त्या घरातून एक सोन्याचे मंगळसूत्र चोरल्याची कबुली दिली.
फोटो : जुन्नर, आंबेगाव तालुक्यात चोऱ्या करणाऱ्या अट्टल चोरट्यासह पोलिसांचे पथक.