शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक न्यायालयातील वाहनतळ वकिलांसाठीच, भुयारी मार्ग सुरू करण्याचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 05:04 IST

शिवाजीनगर न्यायालयाचे पालक न्यायाधीश असलेले मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मकरंद कर्णिक, अनंत बदर आणि भूषण गवई यांनी पुढील आठवड्यात वाहनतळ आणि भुयारी मार्ग सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. सकाळी ९ ते सायंकाळी साडेसहा या वेळेत केवळ वकिलांसाठी हे पार्किंग खुले राहील.

पुणे : कौटुंबिक न्यायालयाच्या नवीन इमारतीतील बहुप्रतीक्षित वाहनतळ खुले होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवाजीनगर न्यायालयाचे पालक न्यायाधीश असलेले मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मकरंद कर्णिक, अनंत बदर आणि भूषण गवई यांनी पुढील आठवड्यात वाहनतळ आणि भुयारी मार्ग सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. सकाळी ९ ते सायंकाळी साडेसहा या वेळेत केवळ वकिलांसाठी हे पार्किंग खुले राहील.त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने येथे ‘पे अँड पार्किंग’चा प्रस्ताव दिला होता. जिल्ह्यात कोणत्याही न्यायालयात ‘पे अँड पार्किंग’ नाही. कौटुंबिक समस्येने ग्रासलेले नागरिक येथे येत असतात. त्यामुळे कौटुंबिक न्यायालयातच याबाबतचा प्रस्ताव देण्यात आल्याने वकील नाराज झाले होते. त्याबाबतचे निवेदन दि पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनने उच्च न्यायालयाला पाठविले होते. त्यानंतर पुणे जिल्हा बार असोसिएशनने कौटुंबिक न्यायालयातील पार्किंग सुरू करण्याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. पार्किंग त्वरित सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील न्यायालयाच्या पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मकरंद कर्णिक, अनंत बदर आणि भूषण गवई यांची शनिवारी बैठक झाली. त्यामध्ये पुणे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र दौंडकर, सचिव अ‍ॅड. विवेक भरगुडे आणि दि पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. गणेश कवडे यांना वाहनतळ आणि भुयारी मार्ग सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले.1 कौटुंबिक न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश डॉ. मंजुळा चेल्लूर यांच्या उपस्थितीत १२ आॅगस्ट रोजी झाले. त्या वेळीच तेथील पार्किंग सुरू होणे अपेक्षित होते.2उद्घाटन होऊन तीन महिने उलटल्यानंतरही येथील वाहनतळ सुरू झालेले नाही. त्याचा वकील, पक्षकारांना त्रास होत आहे. ते जवळच असणाºया शिवाजीनगर न्यायालयात वाहन लावतात. आधीच शिवाजीनगर न्यायालयातच वाहनतळासाठी अपुरी जागा आहे.3त्यात कौटुंबिक न्यायालयाचे कामकाज करणारे वकील, पक्षकारांच्या गाड्या लावण्यात येत आहेत. त्यामुळे येथे गर्दी होत आहे. पुणे जिल्हा बार असोसिएशन आणि दि पुणे फॅमिली कोर्ट असोसिएशनकडून येथील वाहनतळ आणि भुयारी मार्ग सुरू करण्याची वारंवार मागणी करण्यात येत होती.

टॅग्स :Puneपुणे