शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सहायक आयुक्त कंत्राटी कामगारांच्या तक्रारी ऐकणार : पालिका युनियनचा पुढाकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 18:51 IST

महापालिकेत ६ हजारपेक्षा जास्त कंत्राटी कामगार काम करत आहेत

ठळक मुद्देपालिका कर्मचारी युनियनने यासाठी कंत्राटी कामगारांचा मेळावा आयोजित

पुणे : ठेकेदार कंपनीकडून भविष्य निर्वाह निधीबाबत फसवल्या जाणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या तक्रारी आता भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे सहायक आयुक्त स्वत: ऐकणार आहेत. पालिका युनियनने यासाठी पुढाकार घेतला आहे. युनियनच्याच श्रमिक कार्यालयाच्या एकलव्य सभागृहात १५ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता कंत्राटी कामगारांचा मेळावा होणार आहे.महापालिकेत ६ हजारपेक्षा जास्त कंत्राटी कामगार काम करत आहेत. सुरक्षा रक्षकांपासून ते कार्यालयात संगणकावर काम करणाऱ्या कारकुनांपर्यंत महापालिकेने असंख्य कामगार कंत्राटी स्वरूपात भरती केले आहेत. हे सगळे कामगार कंत्राटी कामगार पुरवणाऱ्या कंपन्यांकडून घेतले जातात. पालिका व कंपनी यांच्यात त्यासाठी करार होतो. पालिका कंपनीला त्यासाठी दरमहा पैसे देते. त्या पैशातून कंपनीने कामगारांना वेतन करणे अपेक्षित आहे. यात कामगारांची पिळवणूक होऊ नये यासाठी सरकारने बरेच कायदे केले आहेत. त्यात प्रामुख्याने कंपनीने त्यांच्याकडे असलेल्या कामगारांचा भविष्य निर्वाह निधी जमा करणे, कामगारांना आवश्यक ते साहित्य पुरवणे अशा काही अटींचा समावेश आहे. कामगारांचा भविष्य निर्वाह निधी जमा केल्याच्या पावत्या दाखवल्याशिवाय कंपनीला त्यांचे वेतन अदा करू नये असा नियम आहे. मात्र,कंपनी या सगळ्याकडे दुर्लक्ष करून कंत्राटी कामगारांची पिळवणूक करते. अधिकारी त्यांना साह्य करतात. कोणी विरोध केला की त्याचे नाव कामावरून कमी केले जाते. थकबाकी दिली जात नाही.  पालिका कर्मचारी युनियनने यासाठी कंत्राटी कामगारांचा मेळावा आयोजित केला आहे. भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे सहायक आयुक्त अतुल कोतकर हे या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. ते कामगारांच्या तक्रारी ऐकतील. युनियनचे अध्यक्ष उदय भट व सरचिटणीस मुक्ता मनोहर यावेळी उपस्थित असतील. कामगारांना मेळाव्यात अधिकाऱ्यांबरोबर थेट संवाद करता येईल. कंत्राटी कामगारांचे आर्थिक शोषण थांबवण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला असून कामगारांनी त्याला उपस्थित रहावे असे आवाहन कार्यालयीन चिटणीस वैजीनाथ गायकवाड यांनी केले आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका