शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

वडगावशेरीत शासकिय,खाजगी रूग्णालयात बेड मिळवताना रुग्णांची दमछाक, कोरोना रूग्णवाढीचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 19:29 IST

कोरोना रूग्णसंख्या वाढल्याने रुग्णालयात बेडच उपलब्ध नाहीत

ठळक मुद्देदररोजच्या रुग्णसंख्येत सरासरी ५०० हून अधिकने वाढ

विशाल दरगुडे पुणे शहरात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्याचप्रमाणे वडगावशेरी, खराडी, चंदननगर, विमाननगर ,लोहगाव या परिसरात रुग्णसंख्या थांबण्याचे नाव घेताना दिसत नाहीये. सरकारी रुग्णालयात जागा नसल्याने नागरिक खासगी रुग्णालयात बेड शोधण्यासाठी धडपड करत आहेत. पण वडगावशेरीत शासकिय,खाजगी रूग्णालयात बेड मिळविताना रुग्णांची दमछाक होंतानाचे चित्र दिसून आले आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असून वडगावशेरीत संख्याही वाढत आहे. पैशापेक्षा जीव महत्त्वाचा असल्याने बहुतांश रुग्ण खासगी रुग्णालयात बेड शोधण्यासाठी धडपड करीत आहेत. या खाजगी रुग्णालयात उपलब्ध असल्याचे जरी महापालिका सांगत असले तरी तिथे तो मिळवताना सामान्य रुग्णांची दमछाक होत आहे. गेल्या महिन्याभरापासून कोरोना चा प्रादुर्भाव पुन्हा वाढला आहे. वडगावशेरी, खराडी,चंदननगर, विमाननगर ,लोहगाव या परिसरात रुग्ण संख्या दररोज सरासरी ५००हुन अधिकने वाढत आहे. ती पुणे शहरातील इतर भागांच्या तुलनेत अव्वल असून सातत्याने वाढ होताना दिसत आहे . ही वाढीची संख्या भीतीदायक आहे. कोरोणा ग्रस्तांच्या उपचारासाठी ऐकीकडे  महापालिका विविध यंत्रणा कार्यान्वित आहे. परंतु जम्बो  हॉस्पिटल ,ससून या ठिकाणे बेड उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात पळपळ करायला लागत आहे. मात्र नामांकित खासगी रुग्णालयात कोविडचे बेड सहजरीत्या उपलब्ध होत नाही .

 

टॅग्स :PuneपुणेChandan NagarचंदननगरCorona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या