शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Ashok Kharat Case : 'स्वत:ची अनामिका कापली, अशोक खरातच्या गुन्ह्याची आधीच होती माहिती', अटक करून रुपाली चाकणकरांची चौकशी करा; सुषमा अंधारेंची मागणी, फोटोही दाखवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 12:40 IST

Ashok Kharat Case : नाशिक येथील अशोक खरात प्रकरणात अनेक धक्कादायक माहिती उघडकीस होत आहे. या प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप केले. त्यांनी रुपाली चाकणकर यांचे फोटोही पत्रकार परिषदेत दाखवले.

Ashok Kharat Case : नाशिक येथील अशोक खरात प्रकरणाची राज्यभरात चर्चा सुरू आहेत. या प्रकरणात खरात याचे ५८ आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आले आहेत. आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले. "रूपाली चाकणकर यांना तात्काळ पदावरून हटवून त्यांना अटक करावी आणि त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी," अशी मागणी अंधारे यांनी केली आहे.

सोने, चांदी, महागड्या कार, फार्म हाऊस अन् बरंच काही...; भोंदूबाबा कॅप्टन खरातची संपत्ती किती?

पत्रकार परिषदेत बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, रूपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचे 'सीडीआर' तपासले जावेत. इतकेच नाही तर या दोघांना समोरासमोर बसवून चौकशी होणे गरजेचे आहे. चाकणकर या राजकीय दबावाचा वापर करू शकतात, यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा, अशा मागणीही अंधारे यांनी केली. त्या फरार होण्यापूर्वी पोलिसांनी त्यांना ताब्यात घ्यावे, असेही अंधारे म्हणाल्या.

स्वत:ची अनामिका कापल्याचा धक्कादायक आरोप

यावेळी सुषमा अंधारे यांनी चाकणकर स्वत: तंत्रमंत्रमध्ये होत्या असा धक्कादायक आरोप केला. याबाबत एका पिडितेने आपल्याला सांगितल्याचा दावा अंधारे यांनी केला. २ सप्टेंबर २०२४ ला रोजी सोमवती अमावस्येला स्वत:ची अनामिका कापली होती. रुपाली चाकणकर तंत्रमंत्र विद्या करत होत्या, असा धक्कादायक आरोप सुषमा अंधारे यांनी केला. यावेळी पत्रकार परिषदेत अंधारे यांनी चाकणकर यांचे फोटो दाखवले. या फोटोमध्ये रुपाली चाकणकरांच्या अनामिकाला बँडेंज लावल्याचे दिसत आहे. त्यामुळे रुपाली चाकणकरांना अटक करुन त्यांची नार्को चाचणी करा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली.

संपत्तीची चौकशी करा

या प्रकरणात केवळ पोलीसच नाही, तर ED आणि आर्थिक गुन्हे शाखेने लक्ष घालण्याची गरज असल्याचे अंधारे यांनी म्हटले. खरात याच्या मालमत्ता देश-विदेशात पसरलेल्या आहेत, त्यामुळे खरात आणि चाकणकर यांच्या संपत्तीचे स्त्रोत तपासले जावेत, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे.

पक्षपाताचा आरोप फेटाळला

"यात कुणीही दोषी असेल, मग तो आमच्या पक्षाचा असला तरी कारवाई करा. जयंत पाटील किंवा मिलिंद नार्वेकर यांचीही चौकशी करा," असे आव्हान अंधारे यांनी दिले. मात्र, पाटील आणि नार्वेकर यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नसताना रूपाली चाकणकर यांच्याविरोधात अनेक पुरावे समोर येत असल्याचा दावा त्यांनी केला. चाकणकर सध्या महाराष्ट्रात आहेत की बाहेर, त्या फरार आहेत का? याचा तपासही पोलिसांनी करावा, असे त्या म्हणाल्या.

अंधारेंना धमक्यांचे फोन

या खळबळजनक प्रकरणानंतर सुषमा अंधारे यांनी आपल्याला धमक्या येत असल्याचे सांगितले. "मला कालपासून ८ वेगवेगळ्या नंबरवरून धमक्यांचे फोन येत आहेत. अत्यंत घाणेरड्या भाषेत मला धमकावले जात आहे," असेही त्या म्हणाल्या

English
हिंदी सारांश
Web Title : Sushma Andhare Demands Inquiry Against Rupali Chakankar in Ashok Kharat Case

Web Summary : Sushma Andhare demands Rupali Chakankar's arrest and narco test in the Ashok Kharat case, alleging involvement in occult practices and potential obstruction of justice. She also seeks investigation into their assets.
टॅग्स :Ashok Kharatअशोक खरातCrime Newsगुन्हेगारी