शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

Video - 'माझी आई काळूबाई' चित्रीकरणादरम्यान आशालता वाबगावकर कोरोना पॉझिटिव्ह; प्रकृती चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2020 19:45 IST

‘माझी आई काळूबाई’ मालिकेच्या चित्रीकरणातील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर

पुणे : फलटण तालुक्यात (जि. सातारा) एक महिन्यांपासून सुरू असलेल्या ‘माझी आई काळूबाई’ मालिकेच्या चित्रीकरणातील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यातील काही जण बरे झाले असले तरी अभिनेत्री आशालता वाबगावकर यांची प्रकृती चिंताजनक आहे.

'माझी आई काळूबाई’ या मालिकेचे चित्रीकरण फलटणमध्ये सुरू होते. मुंबईहून काही दिवसांपूर्वी गाण्याचं शुटिंग करण्यासाठी सुमारे २० ते २२ लोक फलटण येथे गेले होते. मुंबईसारख्या कोरोना हॉट स्पॉट भागातून ही मंडळी आल्याने इतर कलाकारांना कोरोनाची लागण झाली. त्यामध्ये मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचाही समावेश आहे. त्यांना १६ सप्टेंबर रोजी वाई येथील रुग्णालयात  दाखल करण्यात आले आहे. मात्र त्यांची ऑक्सिजनची पातळी कमी जास्त होत असल्यामुळे त्यांची प्रकृतीचिंताजनक आहे. अभिनेत्री अलका कुबल या मालिकेत  ‘काळूबाई’ ची मुख्य भूमिका साकारत असून, मालिकेच्या त्या निर्मात्याही आहेत.

         

याविषयी अधिक माहिती अलका कुबल यांनी  ‘लोकमत’ ला सांगितले की, शासनाचा नियमच आहे की कलाकारांची टेस्ट निगेटिव्ह असेल तरच त्यांना सेटवर येण्याची परवानगी देण्यात यावी. त्यामुळे मालिकेचे चित्रीकरण सुरू करण्यापूर्वी आम्ही सर्व कलाकारांची कोरोना टेस्ट केली होती. त्यामध्ये सर्वांसह आशालता वाबगावकर यांचीही टेस्ट निगेटिव्ह आली होती. कलाकारांचा विमा उतरवण्यापासून ते दररोज शरीराचे तापमान, ऑक्सिजन पातळी चेक करणे आणि सेट सँनिटाईज करणे या सर्व गोष्टी नियमानुसार केल्या जात होत्या. मात्र हे कसे घडले माहिती नाही. आम्ही बाहेरच्या लोकांना चित्रीकरणाच्या ठिकाणी येण्याची परवानगीही दिली नव्हती. पण आऊटडोअर गेल्यानंतर युनिटमधून कोण कुठून येतं ते कळत नाही. त्यामुळे कुणाला कुठूनही याची लागण होऊ शकते. काही कलाकार कोरोनामधून बरे झाले आहेत. परंतु वयोमानामुळे आशालता यांची प्रकृती चिंताजनक असली तरी त्यांना कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आलेले नाही. केवळ ऑक्सिजन पातळी वाढविण्यासाठी त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. मात्र वयोमानामुळे काही सांगू शकत नाही.--------------------------------------------------------------------------------------------

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्या