शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी चिंचवड नाट्य परिषदेचा आशा भोसले पुरस्कार रूपकुमार राठोड यांना जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 16:38 IST

वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून संगीत विषयक अभिरूची रूपकुमार यांना असून राठोड यांनी हिंदी, मराठी, उदू अशा तेरा भाषांमध्ये गाणी गायली असून त्यांचे १७ अल्बम प्रसिद्ध झाले आहे.

पिंपरी: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेतर्फे सिद्धी विनायक ग्रुप पुरस्कृत १७ वा आशा भोसले पुरस्कार प्रसिद्ध गायक रूपकुमार राठोड यांना जाहिर झाला आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिली.     

आशा भोसले पुरस्काराचे यंदाचे सतरावे वर्ष असून हा पुरस्कार देश पातळीवर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संगीतकार आणि गायकास आशाजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिला जातो. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, संगीतकार खय्याम, रविंद्र जैन, बाप्पी लहरी, प्यारेलालजी, आनंदजी, हृदयनाथ मंंगेशकर, उषा मंगेशकर, गायक अनु मलिक, शंकर महादेवन, शास्त्रीय गायक पंडित शिवकुमार शर्मा , सुरेश वाडकर, हरीहरन व सोनू निगम, सुनिधी चौव्हाण, उदित नारायण यांना हा पुरस्कार प्रदान केला आहे.  देश पातळीवर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संगीतकार आणि गायकास आशाजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा पुरस्कार दिला जातो. वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून संगीत विषयक अभिरूची रूपकुमार यांना असून राठोड यांनी हिंदी, मराठी, उर्दू अशा तेरा भाषांमध्ये गाणी गायली असून त्यांचे १७ अल्बम प्रसिद्ध झाले आहे. संगीतकार आणि गझल गायक म्हणूनही त्यांचा लौकीक आहे. १९९७ मध्ये बॉर्डर चित्रपटातील  संदेसे आते है....  देशभक्तीपर गीत तरूणाईच्या ओठावर होती. तसेच तेरे नाम, तेजाब, मदहोशी, जहर, नजर, धूमधडाका, लाईफ एक्सप्रेस आणि मराठी चित्रपट गुलमोहरलाही संगीत दिले आहे.  पुरस्कार वितरण शनिवार दिनांक. ९ मार्च रोजी संध्याकाळी ५.३० वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात होणार आहे. यावेळी पुस्काराचे वितरण  माजी मंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते होणार असून, जेष्ठ संगीतकार पं. ह्रदयनाथ मंगेशकर, महापौर राहूल जाधव, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, पाटील, विरोधी पक्षनेता दत्तात्रय  साने आदी उपस्थित राहणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRoop Kumar Rathodरूप कुमार राठोडAsha Bhosaleआशा भोसले