शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

बेलवाडी येथे वृद्धाश्रम उभारणार - अर्जुन देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 23:17 IST

अर्जुन देसाई : ज्येष्ठ नागरिकांचा केला सत्कार

लासुर्णे : स्पर्धेच्या युगात प्रत्येकजण सतत प्रगतीच्या दिशेने धावपळ करत आहे. ज्यांनी जन्माला घातले, वाढवले, शिकवले त्या आई वडिलांकडे लक्ष देण्यासाठी अनेकांकडे वेळ नाही, हे दुर्दैव आहे. यासाठी बेलवाडी (ता. इंदापूर) येथे भव्य वृद्धाश्रम उभारणार आहे, असे नेचर डेअरीचे अध्यक्ष अर्जुन देसाई यांनी सांगितले.

लासुर्णे (ता. इंदापूर) येथील सुधीर लोदाडे मेमोरियल ट्रस्टच्या वतीने बलिप्रतिपदानिमित्त रुग्ण दैवत पुरस्कार व ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा आयोजिला होता, यावेळी देसाई बोलत होते. यावेळी रुग्णसेवा करीत असलेले डॉ. पी. एन. देवकाते यांना रुग्ण दैवत गौरवचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच ज्येष्ठ नागरिकांना शाल, फेटा व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बाळासाहेब घोलप, पंचायत समिती सदस्य अ‍ॅड. हेमंत नरूटे, मनोहर ठोंबरे, पोलीस निरीक्षक एम. डी. निंबाळकर, डॉ. योगेश पाटील, डॉ. कमलाकर व्होरकाटे, डॉ. सुधीर कल्याणकर, डॉ. ज्योतिराम देसाई, डॉ. वायसे, गणेश फडतरे, ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. डॉ. आनंद लोदाडे, प्रणव लोदाडे व सर्व सदस्य आदी उपस्थित होते.

प्रा. लोडाडे यांनी सांगितले, की वयाची साठी गाठल्यावर माणसाला खरी आधाराची गरज असते. परंतु, नेमके याच वयात सर्वजण ज्येष्ठांची हेळसांड करीत असतात. यासाठी या काळात कुणीतरी आदर करावा आपला सन्मान व्हावा, अशी इच्छा ज्येष्ठांची असते. हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून सुधीर लोदाडे मेमोरियल ट्रस्ट गेल्या पाच वर्षांपासून असे उपक्रम राबवित आहे. 

टॅग्स :Puneपुणे