शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चांगल्या कामाचा आनंद लाखमोलाचा : चंद्रशेखर शेठ; अरुणा-मोहनगौरव पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 12:13 IST

सामाजिक कार्यासाठी निरपेक्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना ‘अरुणा-मोहनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येते. यंदा हा पुरस्कार संस्थेच्या शैला टिळक आणि बाळकृष्ण भागवत यांना सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर शेठ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

ठळक मुद्देशैला टिळक आणि बाळकृष्ण भागवत यांना ‘अरुणा-मोहनगौरव पुरस्कार’वंचित विकास संस्थेसाठी काम करणे ही नेहमीच आनंददायी बाब असते : शैला टिळक

पुणे : ‘सामाजिक कार्याला पैशांची कमतरता भासत नाही. त्या कार्याची आवड आणि झोकून देऊन काम करण्याची तयारी असेल तर पैसा आपोआप उभा राहतो. एखादे चांगले काम केले तरी त्यातून मिळणारा आनंद लाखमोलाचा असतो. या आनंदाची अनुभूती प्रत्येक नागरिकाने घ्यावी,’ असे मत सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर शेठ यांनी व्यक्त केले.वंचित विकास संस्थेतर्फे अरुणा मोहन गाडगीळ या दांपत्याच्या स्मृतिनिमित्त सामाजिक कार्यासाठी निरपेक्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना ‘अरुणा-मोहनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येते. यंदा हा पुरस्कार संस्थेच्या शैला टिळक आणि बाळकृष्ण भागवत यांना सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर शेठ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी वंचित विकासचे संस्थापक डॉ. विलास चाफेकर, संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, उपाध्यक्ष व संचालिका सुनीता जोगळेकर, कार्यवाह मीना कुर्लेकर उपस्थित होते. शेठ म्हणाले, ‘सामाजिक कार्य म्हणजे खूप अवघड काम असते, असे नाही. प्रत्येक व्यक्ती हे काम करू शकते. इतरांसाठी लहानसे काम करूनही सामाजिक कार्यात सहभागी होता येते. त्यामुळे प्रत्येकाने चांगले काम करण्याचा प्रयत्न करावा.’  बाळकृष्ण भागवत म्हणाले, ‘समाजामध्ये विश्वास संपादित केला, तर मदत करणाऱ्या हातांची कमतरता जाणवत नाही. यातून मिळणारे समाधान लाखमोलाचे असते. यामुळेच आयुष्याचा शंभरीपर्यंत वंचित बांधवांसाठी काम करेल, याचा विश्वास वाटतो.’या वेळी अभया महिला गटातील महिलांना देण्यात आलेल्या उद्योजकता प्रशिक्षणातील सहभागी मृणाल शुक्ला, अंकिता गोंगले, धनश्री डोके, जेनी लामा, प्रमिला राव, वैशाली पुरकर, माधवी कुंभार, अनघा खिस्ती, अलका गुंजनाळ, अनुजा पाटील, लीनता साने, रिताराणी शितोळे, पल्लवी वाघ यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. मीना कुर्लेकर यांनी सूत्रसंचालन केले. देवयानी गोंगले यांनी प्रास्ताविक केले.

वंचित विकास संस्थेसाठी काम करणे ही नेहमीच आनंददायी बाब असते. यापुढेही जोपर्यंत शक्य आहे, तोपर्यंत संस्थेसाठी काम करीत राहण्याचे ठरवले आहे. संस्थेमुळे ज्यांचा विकास झाला, त्यांनी पुढे येऊन संस्थेच्या कार्यामध्ये सहभाग घ्यावा.- शैला टिळक

टॅग्स :Puneपुणे