शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळा शहराला सुंदर बनविण्यासाठी सरसावला आर्टिस्ट ग्रुप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 12:55 IST

लोणावळा शहरात सुरु असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभाग नोंदवत शहराला सुंदर बनविण्यासाठी लोणावळ्यातील आर्टिस्ट ग्रुपने पुढाकार घेतला आहे.

लोणावळा - लोणावळा शहरात सुरु असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभाग नोंदवत शहराला सुंदर बनविण्यासाठी लोणावळ्यातील आर्टिस्ट ग्रुपने पुढाकार घेतला आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या नगरपरिषद मालकीच्या तसेच खासगी मालमत्ताधारकांच्या भिंती रंगवत त्यावर स्वच्छतेचा संदेश देणारा उदबोधक संदेश व छायाचित्र रंगविण्याचे काम हा आर्टिस्ट ग्रुप करणार आहे.

लोणावळा शहरात स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या माध्यमातून शहर स्वच्छ सुंदर व कचरामुक्त तसेच निर्मल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरु आहेत. नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार, स्वच्छता व आरोग्य सभापती पुजा गायकवाड यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली शहरात स्वच्छेबाबतची कामे व प्रबोधन मोहिम सुरु आहे. नगरपरिषदेचे सर्व विभागाचे कर्मचारी व अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी, शहर‍ातील विविध सामाजिक संस्था व जागृत नागरिक तसेच मान्यवर मंडळींनी यामध्ये पुढाकार घेत झोपडपट्टी ते उच्चभ्रु सोसायट्यांमध्ये जाऊन जनजागृती सुरु केली आहे. नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देत, ओला व सुका कचरा कोणता व तो वर्गीकरण कसा करावा, सुक्या कचर्‍यापासून घरच्या घरी खत निर्मिती, कचरा निर्माण होणार नाही याकरिता काय करावे अशी माहिती देण्याचे काम सर्व स्तरावर सुरु आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात तसेच मुख्य रस्त्याच्या कडेला नगरपरिषदेच्या तसेच खाजगी मालमत्ताधारकांच्या अनेक भिंती आहेत. त्या सर्व भिंती रंगवत त्यावर स्वच्छतेचा संदेश देणारे उदबोधक वाक्य व चित्र रंगविण्यात येणार आहे. लोणावळा शहरातील आर्टिस्ट ग्रुपने यामध्ये पुढाकार घेतला असून या उपक्रमात सर्व हौशी कलाकारांनी, कला शिक्षकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे. या कामाकरिता लागणारे रंग व इतर सर्व साहित्य नगरपरिषद पुरविणार आहे. हौशी कलावंत व शाळांमधील चित्रकलेचे विद्यार्थी हे देखिल यामध्ये सहभाग नोंदवू शकतात त्यांनी सहभागाकरिता मुख्याधिकारी सचिन पवार, कला शिक्षक राजेंद्र दिवेकर, संजय गोळपकर, नितिन कल्याण, सचिन कुटे, संजोग पिसे, सागर तावरे, विशाल केदारी, नितिन तावरे, विशाल बोडके, धनंजय होनंर्गी, प्रमोद प्रांचाळ, हनुमंत वाघमारे, चंद्रकांत जोशी, दत्ता थोरात आदीशी संपर्क साधावा. नवोदित कलाकारांना यामधून आपली कला सादर करण्याची संधी मिळणार असून या रंगकामामुळे शहरात येणारे पर्यटक व नागरिक यांना देखिल स्वच्छतेचे महत्व समजणार आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून रस्त्याच्या कडेला ज्या ठिकांणी वारंवार कचरा टाकला जातो अशा भागातील भिंती देखिल रंगवत त्यावर प्रबोधनपर संदेश लिहिण्यात येणार आहेत.