शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
3
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
4
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
5
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
6
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
7
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
8
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
9
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
10
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
11
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
12
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
13
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
14
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
15
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
16
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
17
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
18
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
19
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
20
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?

अश्लील व्हिडीओ पसरविणाºयाला अटक, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर चेहरा बदलून केला व्हिडीओ प्रसारित, तरुणीची तक्रार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 03:05 IST

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर तरुणीचा चेहरा वापरून अश्लील व्हिडीओ पसरविणा-या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या सदस्याला फरासखाना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. आरोपीने ही क्लिप एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकली होती.

पुणे : व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर तरुणीचा चेहरा वापरून अश्लील व्हिडीओ पसरविणाºया व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या सदस्याला फरासखाना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. आरोपीने ही क्लिप एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकली होती.मयूरेश विजय ताकवले (वय २६, रा. कसबा पेठ, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका २० वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. कसबा पेठेत गावकोस मारुती मंदिराजवळ ही तरुणी रहाते. आरोपीही त्याच परिसरात रहातो. आरोपी ताकवले याने ऋषिकेश दादा पेटकर या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर या तरुणीच्या चेह-याचा वापर करून लैंगिक संबंध असलेला व्हिडीओ प्रसारित केला. आरोपीवर माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. संबंधित तरुणी वाणिज्य शाखेच्या तिस-या वर्षांत शिकत आहे. या तरुणीच्या एका ओळखीच्या मुलाने या व्हिडीओबद्दल माहिती दिली. अश्लील व्हिडीओत छेडछाड करून, संबंधित व्हिडीओतील तरुणीच्या चेहºयाला पीडित तरुणीचा चेहरा लावण्यात आला असल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. संबंधित तरुणाने हा व्हिडीओ कोणत्या ग्रुपवरून आला ते सांगितले. त्यानुसार पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. यावरून पोलिसांनी संशियित तरुणाला अटक केली. त्यानंतर संबंधित संशयित तरुणाला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीशांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण अंबुरे तपास करीत आहे.आरोपी मयूरेश ताकवलेचे शिक्षण बीकॉमपर्यंत झालेले असून, तो एका खासगी कंपनीत काम करतो. फिर्यादी व आरोपी एकमेकांना ओळखत नाहीत.आरोपीने हा इतर ग्रुपवर आलेला व्हिडीओ या ग्रुपवर प्रसारित केल्याचे सांगितले. मात्र, तसे तो सिद्ध करू न शकल्याने त्याला अटक करण्यात आली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण अंबुरे यांनी सांगितले. 

टॅग्स :Crimeगुन्हा