शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव-भीमात पोलिसांचे अटकसत्र, आतापर्यंत ३ अल्पवयीन मुलांसह ११ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 00:45 IST

कोरेगाव भीमा व सणसवाडी येथे १ जानेवारी रोजी झालेल्या हिंसक घटना आणि वढू बुद्रुक येथे पोलीस उपविभागीय अधिका-यांची गाडी फोडल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी अटकसत्र सुरु केले असून आतापर्यंत ३ अल्पवयीन मुलांसह ११ जणांना अटक करण्यात आली आहे.

कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा व सणसवाडी येथे १ जानेवारी रोजी झालेल्या हिंसक घटना आणि वढू बुद्रुक येथे पोलीस उपविभागीय अधिका-यांची गाडी फोडल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी अटकसत्र सुरु केले असून आतापर्यंत ३ अल्पवयीन मुलांसह ११ जणांना अटक करण्यात आली आहे.कोरेगाव भीमा येथील जाळपोळ आणि दगडफेकीचा प्रकार तसेच वढू बुद्रुक येथे २९ डिसेंबर रोजी पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या गाडीवर दगडफेक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन्ही गटांचे आरोपी आहेत. त्यांना कोरेगाव भीमा, सणसवाडी व कोंढापुरी येथून अटक करण्यात आली आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दंगल माजवणे, जाळपोळ, दगडफेक तसेच सार्वजनिक व शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, पोलिसांवर हल्ला करणे आदी कलमांतर्गत त्यांना अटक करण्यात आली आहे.घटनास्थळावरुन ताब्यात घेतलेले सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची ओळख पटविण्यात येत आहे. एक स्वतंत्र पथक आरोपींबाबत माहीती घेत आहे. कोरेगाव भीमातील या घटनेच्या तपासासाठी सुमारे चारशे पोलिसांचे बळ तैनात ठेवण्यात आलेले आहे. पोलिसांनी आरोपींच्या नावाबाबत गुप्तता बाळगली आहे.चौकशीसाठी सांगलीत मोर्चा : कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हल्ल्याची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश व सीबीआयतर्फे चौकशी करावी. दलितांवर झालेल्या अमानुष हल्ल्यातील आरोपींना तातडीने अटक करावी, यासह इतर मागण्यांसाठी सोमवारी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने (आठवले गट) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.मोर्चात जिल्हाभरातून कार्यकर्ते सहभागी झाले होते. रिपाइंचे प्रदेश कार्याध्यक्ष व माजी महापौर विवेक कांबळे आणि जिल्हाध्यक्ष जगन्नाथ ठोकळे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावArrestअटक