शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

सेवा कर न भरल्याप्रकरणी उद्योजकास अटक, : कायद्यानंतरची शहरातील पहिलीच कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 3:18 AM

ग्राहकांकडून वसूल केलेला सुमारे ६ कोटी ९४ लाख रुपयांचा सेवा कर वेळेत सरकारच्या तिजोरीत जमा न केल्याप्रकरणी जीएसटी इंटेलिजन्स विभागाने एम. पी. एंटरप्रायजेस अँड असोसिएट्स लिमिटेड (एमपीईएएल) कंपनीचे चेअरमन मधुकर अनंत पाठक यांना

पुणे : ग्राहकांकडून वसूल केलेला सुमारे ६ कोटी ९४ लाख रुपयांचा सेवा कर वेळेत सरकारच्या तिजोरीत जमा न केल्याप्रकरणी जीएसटी इंटेलिजन्स विभागाने एम. पी. एंटरप्रायजेस अँड असोसिएट्स लिमिटेड (एमपीईएएल) कंपनीचे चेअरमन मधुकर अनंत पाठक यांना सोमवारी अटक केली़ त्यांना शिवाजीनगर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २३ आॅक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे़ जीएसटी कायदा लागू झाल्यानंतरची शहरातील ही पहिलीच कारवाई आहे़डीजीजीएसटीआयच्या पुणे क्षेत्रीय युनिटच्या उपसंचालक वैशाली पतंगे यांच्या नेतृत्वाखाली जीएसटी इंटेलिजन्सच्या विशेष पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. याबाबत जीएसटी इंटेलिजन्सकडून मिळालेल्या माहितीनुसार एम. पी. एंटरप्रायजेस अँड असोसिएट्स लिमिटेड (एमपीईएएल) ही कंपनी विविध सेवा पुरविणारी नोंदणीकृत कंपनी आहे. मनुष्यबळ पुरवठा एजन्सी, भाड्याने चारचाकी वाहन देणे, स्वच्छता सेवा आणि सुरक्षा आणि गुप्तहेर सेवा अंतर्गत नोंदणी करण्यात आली आहे.पुणे शहरात विविध ठिकाणी त्यांची कार्यालये आहेत़ कंपनीने विविध सेवा देताना २०१२-१३ ते २०१५ -१६ दरम्यान सुमारे ६ कोटी ९४ लाख रुपयांचा सेवा कर वसूल केला, पण तो शासनाकडे न भरता त्याचा परस्पर अपहार केला़ यापूर्वी त्यांची चौकशी केली असता कंपनीने ३ कोटी ४४ लाख रुपयांची तीच तीच चलने पुन्हा पुन्हा वापरून फसवणूक केल्याचे उघडकीस आले, तसेच भाड्याने वाहन देण्याच्या व्यवसायात १ कोटी ४९ लाख रुपयांच्या चुकीच्या नोंदी केल्याचे आढळून आले आहे़ २०१५ -१६ मध्ये त्यांनी २ कोटी रुपयांचा कमी कर भरल्याचे आढळून आले आहे़ त्यानंतर त्यांच्यावर फायनान्स अ‍ॅक्ट, १९९४ च्या कलम ९१ (१) नुसार गुन्हा दाखल करून पाठक यांना सोमवारी बाणेर येथील राहत्या घरातून अटक करण्यात आली. पाठक यांना न्यायालयीन कोठडी मंजूर केली असली तरी त्यांच्या व्यवहारांची काटेकोर तपासणी केली जात असल्याचे वैशाली पतंगे यांनी सांगितले़देशभर जीएसटी लागू झाल्यानंतर त्यातील कराची रक्कम शासनाकडे भरली जात आहे की नाही, याची तपासणी जीएसटी इंटेलिजन्सकडून केली जात आहे़त्यात ग्राहकांकडून ज्या दराने सेवा कर वसूल केला गेला, त्याच दराने तो भरला आहे की नाही़ ज्या वस्तूंसाठी जितकी कर आकारणी केली पाहिजे, तितकी केली जात आहे ना, याची तपासणी केली जात आहे़त्यात दोषी आढळणाºयांवर जीएसटी कायद्याअंतर्गत कारवाई केली जाणार आहे़ सेवा कर न भरणाºयांकडून शासनाबरोबरच ग्राहकांचीही फसवणूक केली जात असल्याचे जीएसटी इंटेलिजन्सकडून सांगण्यात आले़

टॅग्स :GSTजीएसटीArrestअटकPuneपुणे